Friday, April 19, 2024

Latest Posts

लसणीचे सेवन केल्याने शरीरासंबंधित अनेक समस्या होतात दूर, जाणून घ्या सविस्तर माहिती

लसूण (Garlic) ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

लसूण (Garlic) ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. पोटाच्या समस्या म्हणजेच, गॅस, वाढलेले वजन, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. लसूणीचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने हाडांच्या आणि पोटाच्या समस्या लवकर बऱ्या होतात. कच्चा लसूण खाल्ल्याने यौगिक एलिसिन (Allicin), कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. लसणीमध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये ब्लड फिल्टरेशनचे काम होते. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जर शरीरामध्ये बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होत असतील तर अश्यावेळी लसूण खाणे फायदेशीर ठरते. मात्र चुकीच्या वेळी आणि लसूण खाल्ल्याने अनेक समस्या उदभवू शकतात.

सकाळी उठल्यानंतर लसणीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. अपचनाची समस्या दूर होते. पोटातील घातक बॅक्टेरिया मरतात आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांचे दुखणंही कमी होते. लसणीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. लसूण खाणे हा सांधेदुखीवरील रामबाण उपाय आहे. लसणीचे सेवन केल्याने काही समस्या कायमच्या बऱ्या होतात. सर्दी, खोकल्यासोबतच लिव्हर फंक्शनच्या समस्या दूर करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरते. ज्या व्यक्तींना अॅसिडीटी, गॅस आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये. लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि त्यामुळे शरीराला अधिक फायदा होता.

हे ही वाचा: 

आमच्या पक्षाला बळ मिळू शकते, त्यांच्याशी आमची चर्चा होते – Devendra Fadnavis

Team India वर शोककळा!, माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss