काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात? विरोधी पक्षाने यायचं की नाही हे त्यांना विचारा. आम्ही कोणतेही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते आपल्यासोबत येऊ शकतात, त्यांच्या येण्याने आमच्या पक्षाला बळ मिळू शकते, त्यांच्याशी चर्चा होते. त्यांनाही मुख्य प्रवाहात यावं असं वाटत असेल तर ते येतात. अनेक नेत्यांशी चर्चा सुरु आहे. आकडा वगैरे मी मानत नाही पण जमिनीशी जुळलेले नेते आमच्याबरोबर येणार आहेत, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, मी त्यांना अडचणीत आणणार नाही. त्यांचीही आम्ही वाट पाहतोय. पण अजून कोणतीही चर्चा न झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात सांगितले.
पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. खूप विचार करावा लागला. महाराष्ट्राच्या हितासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतला. एका दिवसात निर्णय घेतला नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मी कुणालाही निमंत्रित आमंत्रित केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस बाकीचं पाहतील, असं अशोक चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द केले. जनतेची भावना समजून त्यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यात मोदी सक्षम आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच अशोक चव्हाण म्हणाले, विरोधात आणि सत्तेत असताना देखील फडणवीसांचे आणि आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. ३८ वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीसांनी नेहमी आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात आगामी निवडणुकीत भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु