Friday, May 17, 2024

Latest Posts

चमकदार त्वचेसाठी काही टिप्स

पण त्वचेवर नैसर्गिक उजळ आणण्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.  

चेहरा चमकदार असावा हे स्त्री आणि पुरूष दोघांनाही वाटत असते. सध्या मार्केट मध्ये चेहऱ्यावर लगेच ग्लो येण्यासाठी अनेक क्रीम आपण वापरत असतो. पण त्वचेवर नैसर्गिक उजळ आणण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक टिप्स देणार आहोत. हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

१. हॉट आणि कोल्ड फेसपॅक

चेहऱ्याला उजळ रंग देणे. त्वचेकडे रक्त प्रवाह वाढवणे. त्वचेचा पोत सुधारणे. त्वचेचा ओलावा राखणे. अशी सगळीच कामे ह्या हॉट आणि कोल्ड फेसपॅकने साध्य होतात.यासाठी एक जाडसर टॉवेल घ्या आणि तो गरम पाण्यात पिळून चेहऱ्यावर लावा. त्यांनतर काहीवेळाने टॉवेल थंड पाण्यात पिळुन चेहऱ्यावर ठेवा.

२. चेहऱ्यावर नियमितपणे मसाज करा 

एखादे तेल खास करून बदामाचे असल्यास ते चेहऱ्याला लावायचे आणि हलक्या बोटांनी ते चोळायचे. ते तेल आत मुरेपर्यंत बोटांनी मालिश करत राहायचे, जेणेकरून त्वचा मऊ राहील.

३. गाजराचा रस 

गाजराचा रस बऱ्याच कारणांसाठी शरीरास उपयुक्त आहे. चेहऱ्यासाठी गाजराचा रस हे उत्तम टॉनिक ठरते. गाजराचा रस नियमित प्यायल्याने पिंपल्स म्हणजेच फोड येण्याची समस्या खूप कमी होते.

४. पौष्टिक आहार 

आपण घेतो तो आहार सकस असला पाहिजे. बाहेर बनवलेले, तेलकट आणि तिखट पदार्थ जर रोजच खात असू तर त्याने चेहऱ्यावर फोड येणे, त्वचा तेलकट होणे असे परिणाम दिसून येतात. यापेक्षा फळे, प्रोटिनयुक्त आहार, भाज्या, मासे ह्यांचे सेवन करावे. हे पदार्थ आपल्या त्वचेला सतेज बनवतात.

५. चेहऱ्यावर बर्फाचा मसाज  

चेहऱ्याचा तरुणपणा राखण्यात बर्फ उपयोगी पडतो. खरोखरीच चेहऱ्याला ताजा तवाना करतो. ह्या मसाजमुळे रक्त प्रवाह वाढतो. त्वचेवर सुरकुत्या न होण्यास मदत होते. ह्या सगळ्याचा फायदा त्वचा सतेज होण्याकरता होतो.

Latest Posts

Don't Miss