आंबा कापला की फोडी काळ्या पडतात? तर ‘हे’ घरगुती उपाय

प्रत्येक जण उन्हाळ्यात आंब्याची आतुरतेने वाट बघत असतो. आंबा हे लहानग्यापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचेच आवडीचे फळ आहे.

आंबा कापला की फोडी काळ्या पडतात? तर ‘हे’ घरगुती उपाय

प्रत्येक जण उन्हाळ्यात आंब्याची आतुरतेने वाट बघत असतो. आंबा हे लहानग्यापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचेच आवडीचे फळ आहे. आंब्याचा गोड स्वाद, केशरी अस्सल रंग, चव यामुळे आपल्याला आंबा खावासा वाटतो. वर्षभर आंब्याची वाट बघून उन्हाळ्यात दोन महिने मनसोक्त आंबा खाण्याचे सुख जणू हे प्रत्येकासाठीच स्वर्गसुख असते. यामुळेच फळांच्या राजाला उन्ह्याळ्यात मोठ्याप्रमाणात मागणी असते.

प्रत्येकाचीच आंबा खाण्याची स्टाईल ही वेगवेगळी असते. कोण त्याचा आमरस करुन तो पोळी किंवा पुरीसोबत खातो. नाहीतर कोण आंब्याचे पुडींग, मिल्क शेक, शिरा, जेली, केक, आईस्क्रीम असे काही ना काही पदार्थ करुन खातो. आंबा खाताना त्याच्या छोट्या छोट्या फोडी कापून खाण्याला आपल्याकडे जास्त पसंती दिली जाते. परंतु आंब्याच्या फोडी कापून थोड्या वेळासाठी अशाच ठेवल्या तरीही त्या लगेच काळ्या पडतात. केळी, सफरचंद, आंबा इत्यादी काही फळे कापल्यानंतर लगेच काळी किंवा लाल पडतात. हे घडते कारण जेव्हा फळ हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होऊन ते काळे पडतात.

खवय्यांची पसंती मात्र केशरी,लाल पिवळ्या आंब्या साठी च असते,इतकेच नाही तर कोणालाही काळ्या पडलेल्या आंब्याच्या फोडी खायला आवडत नाही. आंब्याच्या फाफोडी काळ्या पडू नये या साठी नेमके कोणते घरघुती उपाय केले पाहिजे चला जाणून घेऊयात.

१. साखरेच्या पाण्यात ठेवणे –

आंब्याच्या कापलेल्या फोडी साखरेच्या पाण्यात ठेवाव्यात जेणेकरून साखरीमध्ये असणारे पेप्टाइड कंपाऊंड पॉलीफेनॉल ऑक्सिडेस एन्झाइमला फिनोलिक संयुगे गडद रंगद्रव्यांमध्ये रूपांतरित करण्यापासून प्रतिबंधित करते, यामुळे आंब्याच्या फोडींचा रंग बदलून काळा होत नाही.

२. आंब्याच्या फोडी डिप फ्रिजरमध्ये ठेवाव्यात –

आंबाच्या फोडी करून त्या डीप फ्रीझर मध्ये ठेवल्याने त्या फोड्या गोठतात, गोठवल्याने फळ खराब होण्याची क्षमता कमी होते. फळ डिप फ्रिज करून ठेवल्याने फळांमधील सूक्ष्म जीवांची वाढ रोखण्याचे काम केले जाते.

३. आंब्यांच्या फोडींना फूड रॅपरमध्ये गुंडाळून ठेवणे –

आंब्याच्या फोडी डिशमध्ये ठेऊन ती फूड रॅपर ने गुंडाळून ठेवल्याने आंबा काळा होणार नाही,कारण तो एंजाइम सोडून हवेशी प्रक्रिया करु शकणार नाही. अशाप्रकारे ऑक्सिडेशन थांबेल आणि आंब्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत.

४. आंब्याच्या फोडी लिंबाच्या रसात भिजवणे –

आंब्याच्या तुकड्यांना लिंबू पाण्यात भिजवल्याने आंबा काळा होत नाही. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version