Saturday, May 18, 2024

Latest Posts

कडुलिंबाचे ”हे” फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

कडुलिंबाचे झाड हे भारतात जास्त आढळतात. कडुलिंब हे गुणकारी आहे. कडुलिंबाच्या पानाचे नियमित सेवन केल्यास कोणताही गंभीर आजार होत नाहीत. कडुलिंबाचे पाने चवीला खूप कडू असतात त्यामुळे सहसा ते खायला लोक कंटाळा करतात. केस आणि त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी कडुलिंबाचा वापरू शकता. सध्या ऊन खूप वाढत आहे त्यामुळे चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात आणि चेहरा काळ पडतो आणि केसांच्या पण समस्या जाणवतात. अशा वेळी कडुलिंबाच्या पानांचा काय वापर होऊ शकतो . चला तर मग जाणून घेऊयात. कडुलिंबामध्ये पोषक घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करण गरजेचे आहे.

हिवाळ्याच्या दिवसात दररोज कडुलिंबाचे पाने पाण्यात टाकून अंघोळ केल्यास त्वचेला चांगला फायदा होऊ शकतो आणि केसांच्या समस्या पण दूर होऊ शकतात. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडते. त्वचेला कडुलिंबाचे तेल लावल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते. चेहऱ्यावरचे सुरकुत्या कमी करायचे असतील तर नियमित कडुलिंबाचे तेल लावा किंवा कधी तरी कडुलिंबाच्या पानांचा लेप लावु शकता. चेहऱ्यावर मुरुमं आले असतील किंवा त्याचा डाग राहिला असेल तर त्यावर तुम्ही कडुलिंबाचा लेप लावल्यास मुरुमांचे डाग लवकर जातात. वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवटपणा येत असेल तर कडुलिंबाचे पाने चुरगळून लावा किंवा पेस्ट पण करून लावू शकता.

हे ही वाचा:

”या” कारणांमुळे अमृता शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो

घरच्या घरी बनवा लिप बाम आता विकत घ्याची गरज नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss