तुम्ही सतत एसीमध्ये बसता… ? तर हे नक्की वाचा

गरमी असो वा नसो परंतु काही लोकांना एसीची सवयच झालेली असते. घर असो वा ऑफिस किंवा कार सगळीकडेच त्यांना एसी हा हवा असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का ?...

तुम्ही सतत एसीमध्ये बसता… ? तर हे नक्की वाचा

मुंबई :- गरमी असो वा नसो परंतु काही लोकांना एसीची सवयच झालेली असते. घर असो वा ऑफिस किंवा कार सगळीकडेच त्यांना एसी हा हवा असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का ?… ही सवय तुम्हाला अनेक आजारांच्या दारात नेऊन ठेवू शकते. उन्हाळ्यात एसीशिवाय राहणं शक्य तर नाही, पण त्याचा वापर कमी केला जाऊ शकतो. २४ तास एसीमध्ये राहिल्याने ताजी, स्वच्छ हवा मिळत नाही. कारण एसी सुरु करण्यापूर्वी खिडक्या आणि दारं बंद केले जातात. या रुममध्ये हवा तेवढ्याच परीसरात बंद होते. ताजी हवा न मिळणे तुमच्या शरीराच्या विकासात अडथळा निर्माण करु शकते.

बदलती लाइफस्टाईल फक्त आपल्या आरोग्यावर नाही, तर हाडांवरही प्रभाव करत आहे. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पौष्टीक अन्न सेवन करणे गरजेचे आहे. खूप वेळ वातानुकूलित वातावरणात राहिल्यामुळे हाडं कमकूवत होतात. त्यामुळे एसीची सवय हि सोडा, तेव्हाच तुमच्या हाडांची मजबुती टिकून राहील. एसी शिवाय आणखी खूप गोष्टी आहेत, जे करणे टाळले पाहिजे, जर तुम्हाला हाडांना मजबूत ठेवायचे असेल तर. हाडांच्या वेगवेगळ्या समस्याही तुम्हाला हळूहळू जाणवू लागतात. एसीमध्ये झोपल्याने रुममध्ये तापमान खूप होतं. अशात शरीरही खूप थंड होतं आणि आपल्याला याचा अंदाजही होत नाही. याच थंडीमुळे हाडांची समस्या तुम्हाला भेडसावू शकते. हीच समस्या पुढे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देते. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी अशा गोष्टींचे सेवन करा ज्यात विटामिन-डी अधिक प्रमाणात आहे. जेवणात दूध, बदाम, तांदूळ, जूस या गोष्टींचा समावेश करा.

एसीमुळे जसा शरीरातील हाडांवर परिणाम होतो तसेच आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

हे ही वाचा :- 

भाजप त्यांच्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांचे विधान  

 

Exit mobile version