Friday, May 17, 2024

Latest Posts

दक्षिण मुंबईचा महायुतीचा उमेदवार ठरला; अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव मैदानात

मुंबई दक्षिणमधून महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत(Arvind Sawant)हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याची घोषणा झाली नव्हती. पण आज मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून “यामिनी यशवंत जाधव” (Yamini Yashwant Jadhav)यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेच्या ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवर देण्यात आली आहे.

मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून देखील राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) हे इच्छूक होते. अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र देखील सुरु होते. त्यांनी ३ ते ४ महिन्यांपासून तयारी केली होती. मात्र त्यांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. भायखळा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यामिनी जाधव ह्या नगरसेविका राहिल्या आहेत तर, महापालिकेमध्ये देखील त्यांना पदे भुषवले आहे. सध्या त्या विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव (Yashwant Jadhav)हे देखील मुंबई महापालिकेमध्ये सदस्य होते. मुंबई दक्षिण मध्ये त्यांनी मोठे काम केले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात वरळी, मलबारहिल, शिवडी, मुंबादेवी, कुलाबा या मतदारसंघाचा समावेश होतो. त्यामुळे ह्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेवाराची वर्णी लागल्याने ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकिट देण्याचा निर्णय आधीच झाला आहे. ही जागा आम्ही लढवावी असं मनात होतं. मात्र तीन जागा शिवसेना लढवणार असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे हा निर्णय झाला आहे असा दावा केला आहे. दरम्यान जुने सहकारी असलेले अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना उमेदवारी जाहीर झाल्याने दक्षिण मुंबईत चांगलीच लढत रंगणार असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

Exclusive: Thane लोकसभेतून Naresh Mhaske यांची उमेदवारी निश्चित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss