Friday, May 17, 2024

Latest Posts

Two Wheeler च्या नोंदणीसाठी नवीन Numbers होणार सुरु

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.  ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करायचा असेल, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI) (EAST) किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व) (RTO MUMBAI) (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह २ मे २०२४ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या ८ मे २०१६ च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्काव्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात जाऊन अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

हे ही वाचा:

जर उन्हाळ्यात राहायचं असेल फ्रेश तर ही स्मुदी नक्की ट्राय करा

असे करा करवंदाचे लज्जतदार लोणचे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss