Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आवळ्याचा चहा पिल्याने शरीराला होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आवळा (Amla) हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आवळा (Amla) हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) जास्त प्रमाणात असल्याने शरीराला अनेक फायदे होतात. केस, डोळे आणि त्वचेसाठी आवळा खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करत असाल तर तुमच्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतील. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याचे सेवन केले जाते. तसेच ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी नियमित आवळा खाल्ला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. पण ग्रीन टी (green tea) ऐवजी तुम्ही आवळ्याच्या चहा पिऊ शकता. आवळ्याचा चहा नियमित पिल्याने पोटातील घाण साफ होते.

आवळ्याचा चहा (Amla tea) बनवण्याची रेसिपी

आवळ्याचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका छोट्या टोपामध्ये २ कप पाणी घेऊन ते ग्राम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात थोडे आले किसून टाका. आलं टाकून झाल्यानंतर पाण्याला चांगली उकळी काढून घ्या. त्यात ४ ते ५ तुळशीची पाने टाकून घ्या. त्यानंतर त्यात १ चमचा आवळा पावडर घालून चहा चांगला उकळून घ्या. पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करा आणि आवळ्याचा चहा गाळून प्या. हा चहा तुम्ही रोजच्या चहाप्रमाणे थोडा थंड झाल्यानंतर सुद्धा पिऊ शकता. चहा व्यतिरिक्त तुम्ही आवळ्याच्या पावडरपासून पेय किंवा स्मूदी बनवू शकता. हा चहा नियमित पिल्याने पोटातील घाण साफ होते आणि वजन कमी होते.

आवळ्याचा चहा रोजच्या रोज पिल्याने शरीरसंबंधित अनेक समस्या कमी होतात. बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आवळ्याचा चहा पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेल्या आवळ्याचे शरीराला अनेक फायदे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्याचा चहा पिल्याने चयापचय गतिमान होऊन लठ्ठपणा कमी होतो.

हे ही वाचा:

Late Night Eating Disadvantages : तुम्ही देखील रात्री उशिरा जेवता?

पेरुच्या पानाची चटणी आरोग्यासाठी ठरते फायदेशीर,जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss