Tuesday, April 16, 2024

Latest Posts

पेरुच्या पानाची चटणी आरोग्यासाठी ठरते फायदेशीर,जाणुन घ्या

पेरु हे फळ खाण्यासाठी रुचकर असते.मात्र त्यात अनेक पोषकतत्वांचा समावेश केलेला असतो.फळांमध्ये तर व्हिटॅमिन डी असतो.

पेरु हे फळ खाण्यासाठी रुचकर असते.मात्र त्यात अनेक पोषकतत्वांचा समावेश केलेला असतो.फळांमध्ये तर व्हिटॅमिन डी असतो.त्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पेरू जितके आरोग्यदायी फायदे आहेत, तितकेच पेरूच्या पानांमध्येही अनेक फायदे आहेत.पेरुच्या पानांचे फायदे हे अनेकांना याची माहिती देखील नसते,पेरूच्या पानांपासून चहा आणि चटणीही बनवता येते. पेरूच्या पानांची चटणी केवळ तुमच्या जेवणाचीच चव वाढवते असे नाही तर यामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात.पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया पेरूच्या पानांच्या चटणीचे फायदे

रक्तातील साखरेचे नियंत्रण

जर रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर पेरुच्या पानाच्या चटणीचे चांगले फायदे शरीरासाठी होत असतात.त्यामुळे आपली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.त्यामुळे पेरूची चटणी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे.

हृदयासाठी चांगले

पेरूमधील पोटॅशियम आणि विरघळणारे फायबर हृदयाचे रक्षण करते, तसेच खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार होऊ शकतो.पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे विषारी पदार्थ नष्ट करतात.

मासिक पाळीच्या वेदना

अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखीचा त्रास होतो. चटणीबरोबर पेरूच्या पानांचा रसही या वेदनांवर नियंत्रण ठेवू शकतो. या रसाचे रोज सेवन केल्यास फायदा होतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त

पेरूच्या पानांची चटणी खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

तणाव कमी होतो

तणाव कमी करण्यासाठी पेरूचा चहा देखील सेवन केला जाऊ शकतो. तुम्हाला दिवसभर तणाव किंवा थकवा वाटत असेल, डोकेदुखी असेल आणि काय करावे हे कळत नसेल, तेव्हा पेरूचा हर्बल चहा पिण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला तणावातून आराम मिळेल.दरम्यान पेरुच्या पानाची चटणी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरत.

हे ही वाचा:

तुम्हाला तुमचा चेहरा नेहमी ग्लोईंग हवा असेल तर ‘या’ पद्धती फॉलो करा

मनोज जरांगे पाटील यांच्यावर ‘या’ महिलेने केले गंभीर आरोप, म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss