Saturday, July 27, 2024

Latest Posts

रोज अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे; जाणून घ्या सविस्तर माहिती

अंजीर (Fig) हे फळ शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

अंजीर (Fig) हे फळ शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे फळ कोरडे आणि ताजे दोन्ही प्रकारे खाऊ शकतो. थंडीच्या दिवसात अंजीर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये तापमानवाढीचा प्रभाव जास्त असतो.त्याच्यामध्येअँटीऑक्सिडंट्स(Antioxidants),पॉलिफेनॉल(Polyphenols) आणि फायबर(fiber) मुबलक प्रमाणात आढळून येतात. रिकामे पोटी अंजीर खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे काही लोक सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस अंजीर खातात. पण तुम्हला माहित आहे का रोज अंजीर खाल्याने शरीराला काय फायदे होतात? तर आज आपण जाणून घेऊयात अंजीर खाण्याचे फायदे..

नियमितपणे अंजीर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर सकाळी उठून खाल्ल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. त्यामुळे नियमित अंजीर खाऊन आपण शरीर निरोगी ठेवू शकतो. अंजीरमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स हे घटक आढळतात. जर तुम्ही महिनाभर अंजीर सतत खाल्ले तर ते शरीराला खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक आढळतात. याशिवाय अंजीरमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी1, बी2, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज, सोडियम, फायबर आढळून येते. हे पोषक घटक नैसर्गिक औषध म्हणून शरिराला उपयोगी ठरतात. अंजिराचे पीक ऑस्ट्रेलिया, चिली, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ऑरेगॉन, टेक्सास व वॉशिंग्टन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अंजीर फळामध्ये मुबलक प्रमाणात लोहाचे प्रमाण जास्त असते. या फळातील औषधी गुणामुळे पित्त विकार,रक्तविकार व वात यांसारखे आजार दूर होतात.

हे ही वाचा:

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा, २४ डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यंत कोल्हापुरमध्ये जमावबंदी लागू

Shivsena – NCP पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये महाभूकंप होणार? ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss