Wednesday, February 28, 2024

Latest Posts

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा, २४ डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यंत कोल्हापुरमध्ये जमावबंदी लागू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली होती. तसेच आज मनोज जरांगे यांच्या भव्य सभेचे आयोजन बीडमध्ये करण्यात आले होते. राज्य सरकारने जर २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. याच पार्शवभूमीवर आता कोल्हापूर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये २४ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी (Kolhapur Curfew) लागू करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमध्ये जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कलम ३७ अ नुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समिती स्थापन केली. या समितीच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. पण राज्य सरकारची ही भूमिका सरकारला मान्य नसल्यामुळे २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्यावं आणि तेही सरसटक द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

हिवाळ्यात बीटाचा रस पिणं शरीरासाठी ठरतं फायदेशीर

रामदास आठवलेंची Lok Sabha Election संदर्भात महत्त्वाची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss