Monday, April 22, 2024

Latest Posts

तुम्हाला तुमचा चेहरा नेहमी ग्लोईंग हवा असेल तर ‘या’ पद्धती फॉलो करा

बदलती जीवनशैली, सवयी यामुळे आपल्या शरीराला वेगवगेळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

बदलती जीवनशैली, सवयी यामुळे आपल्या शरीराला वेगवगेळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम जसा शरीरावर होतो तसाच परिणाम त्वचेवर देखील होतो. अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples), पिगमेंटेशन (Pigmentation), ब्लॅकहेड्स (Blackheads) आणि व्हाईट हेड्स (White heads) या सर्व गोष्टी दिसून येतात. त्यामुळे चेहरा निस्तेज आणि काळवंडलेला दिसू लागतो. या समस्यांमुळे चेहऱ्यावरचे सौंदर्य बिघडून जाते. तसेच चेहरा चांगला दिसण्यासाठी आपण रोज मेकअप करतो. पण या मेकअपमुळे हळूहळू त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. पण जर तुम्हाला तुमचा चेहरा मुलायम, ग्लोईंग आणि डागमुक्त हवा असले तर ‘या’ टिप्स तुम्ही नक्की वापरून पाहू शकता. सगळ्यात आधी चेहऱ्याची पोत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.

एक्सफोलिएशन (Exfoliate)

स्त्रियांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. तेव्हा धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होण्यास सुरुवात होते. हे सर्व काढून टाकण्यासाठी चेहऱ्याची त्वचा नियमित एक्सफोलिएट (Exfoliate) करणं गरजेचे आहे. आठवड्यातून कमीत कमी दोनदा त्वचा एक्सफोलिएट केली पाहिजे. हलक्या हाताने चेहरा स्क्रब करून घ्या. हलक्या हाताने चेहरा स्क्रब करून न घेतल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

मॉईश्चराईझ (Moisturize)

अनेकदा तेलकट त्वचा असलेल्या महिला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं टाळत असतात. मॉइश्चरायझर लावल्याने चेहरा अधिक तेलकट होतो असा अनेकांचा समज आहे. पण मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. दिवसातून दोनदा चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्याने चेहरा मऊ होण्यास मदत होते.

सनस्क्रीन (Sunscreen)

त्वचेची पोत सुधारण्यासाठी सनस्क्रीन मदत करते. SPF युक्त सनस्क्रीन वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होतात. हिवाळ्यातसुद्धा सनस्क्रीन वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरले पाहिजे.

तेलाचा वापर

दररोज चेहरा कमीत कमी ३ ते ४ मिनिटं तेलाने मॉलिश केला पाहिजे. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा इतर कोणत्याही तेलाने तुम्ही चेहरा मॉलिश करू शकता. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

हे ही वाचा: 

गूळ – चणे खायचा सल्ला का दिला जातो ? तुम्हाला माहित आहे का ?

Manoj Jarange Patil मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळा बदला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss