बहुदा आपल्या जेवणात प्रामुख्याने विविध प्रकारच्या डाळींचा आणि कडधान्यचा वापर केला जातो.या डाळींचा आणि कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.या कडधान्यांमध्ये समाविष्ट असलेले हिरवे मूग पोषकघटकांनी परिपूर्ण आहेत. हिवाळ्यात या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हिरव्या मुगापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो.दरम्यान घरोघरी मुगाची भजी ही प्रामुख्याने बनवली जाते.हिवाळ्यात आपण उबदार पदार्थ खात असतो.त्यामुळे भजी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.हिरव्या मुगाचा शरीराला काय काय फायदे होतात,ते आपण जाणुन घेऊयात
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हिरव्या मुगाचा समावेश करणं खुप फायदेशीर ठरतंमूळात हिरव्या मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो, त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हिरव्या मूगाचा आहारात समावेश करणे हे फायदेशीर ठरते. या हिरव्या मूगामध्ये आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे आपले अन्न सुरळीतपणे पचते.त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. परिणामी ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात हिरव्या मूगाचा जरूर समावेश करावा.
हृदयासाठी फायदेशीर
हिरव्या मूगामध्ये फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे, हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय, रक्तदाब देखील सुरळीत राहतो.ज्या लोकांना रक्तदाब किंवा हृदयविकाराची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मूगाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
प्रथिनांचा उत्तम स्त्रोत
हिरव्या मुगामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा भरपूर समावेश आढळून येतो. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून ही हिरव्या मुगाला प्रामुख्याने ओळखले जाते. वनस्पती आधारित असलेले हे हिरवे मूग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.पेशींच्या वाढीसाठी आणि दुरूस्तीसाठी हिरवे मूग मदत करतात. यासोबतच शरीरातील हार्मोन्सच्या निर्मितीसाठी प्रथिने अतिशय आवश्यक आहेत.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणूक, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमदारांनी गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर – Jayant Patil