Saturday, July 27, 2024

Latest Posts

आमदारांनी गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर – Jayant Patil

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला असून या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत. या घटनेमुळे राजकीय मंडळींकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोशल मीडियाद्वारे मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. तसेच,  याबाबत अधिवेशनातही ते बोलले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ च दिसत असल्याचे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात काल उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधुसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

उल्हासनगर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर, केली मोठी घोषणा

सोशल मीडियावर आरक्षणाबत प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी जालन्यातील २७ शिक्षकांना नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss