Friday, May 17, 2024

Latest Posts

या 3 ट्रिक्स वापरून चेहरा बनवा तजेलदार

या गोष्टी वापरून चेहरा अगदी बेदाग आणि उजळता राहतो.

सध्या मार्केट मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फेस पॅक मिळतात. जे वेगवेगळ्या समस्यांसाठी वापरले जातात. पण पूर्वीच्याकाळी होम रेमेडीजचा वापर करून या सगळ्या गोष्टी घरातच तयार केल्या जातात. या गोष्टी वापरून चेहरा अगदी बेदाग आणि उजळता राहतो. आणि स्किन देखील हेल्दी राहते. आता आपण जाऊन घेऊया तीन स्किन प्रॉब्लेमसाठी दही आणि बेसन पॅक कशा पद्धतीसाठी तयार केला जातो.

दही आणि बेसनसोबत लिंबू मिक्स केल्यावर, टॅनिंग सोबतच चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यासाठी उपयुक्त आहे. हा फेस पॅक स्किनला पूर्णपणे एक्सफोलिएट करतो. या फेस पॅक तयार करण्यासाठी 2 चमचे बेसन पिठात पेस्ट तयार होईल इतके दही, थोडीशी हळद, आणि लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाकून, 20 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवावे. नंतर चेहरा पूर्णपणे धुवून मॉइश्चराइजर लावावे. याने स्किन पूर्णपणे उजळते.

दही आणि बेसन मिस्क करून पेस्ट तयार करा. आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिट लावावे. आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. यामुळे त्वचेवर उजळपणा येतो. आणि चेहरा निखरतो.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर, बेसन आणि दह्यामध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. हा फेस पॅक एंटीऑक्सीडेंट्स आणि एंटीबैक्टीरियल ने उपयुक्त आहे. हा फेस पॅक तयार करणे अगदी सोप्पा आहे. एका भांडयात 2 चमचे बेसन, थोडंसं दही आणि मध मिक्स करावे. आणि 15 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवावे. फरक तुम्हाला स्वतःलाच जाणवेल.

Latest Posts

Don't Miss