Monday, April 22, 2024

Latest Posts

Dragon Fruit चे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) हे आरोग्यासाठी चांगले असते. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आइसस्क्रीम बनवता येते. फेस पॅक म्हणून पण या फळाचा वापर केला जातो.

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) हे आरोग्यासाठी चांगले असते. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आइसस्क्रीम बनवता येते. फेस पॅक म्हणून पण या फळाचा वापर केला जातो. या फळाचे  भारतापेक्षा थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंका येथे जास्त सेवन केले जाते. पण भारतामध्ये आवडीने खाल्लं जात. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे फळ अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास या फळाचा उपयोग होतो. पचनाचा त्रास असेल अश्या लोकांनी ड्रॅगन फ्रुटच सेवन केल्यावर पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन भारतात होत नाही . हे फळ मूळ मेक्‍सिको देशातील पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई येथे फळाची लागवड केली जाते. या देशांबरोबर कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशात पण या फळाची  लागवड केली जाते. ड्रगन फ्रुटचे विविध जाती आहेत.

हे फळ दिसायला गुलाबी आणि आतून पांढरे असते त्यामध्ये किवी सारख्या बिया असतात. हे फळ मधुमेह (Diabetes). नियंत्रित राहण्यास मदत करते. ड्रॅगन फ्रुट खाल्यावर सौंदर्यमध्ये वाढ होते. या फळापासून फेस पॅक, केसांचा मास्क, इत्यादी बनवला जातो. तसेच हे फळ चहेऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. हे फळ चवीला आंबट असते. यामुळे दात आणि हाडे मजबूत राहतात. गर्भवती महिलांनी या फळाचे सेवन केल्यास होमोग्लोबिनची कमतरता बाळाला होत नाही.लठ्ठपणा आणि चरबी वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. अश्या लोकांनी या फळाचा वापर करावा. त्यामुळे चरबी आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

हे ही वाचा:

ओल्या काजूची भाजी कशी करायची?

‘हा’ अभिनेता शंकराचा मोठा भक्त, छातीवर आहे शंकराचा टॅटू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss