Tuesday, April 23, 2024

Latest Posts

उष्माघातापासून बचाव कसा करायचा? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची?

उन्हाळ्यात शरीरात पाणी असणे महत्वाचे आहेत. शरीरातले पाणी कमी झाल्यास अनेक आजारांना बळी पडावे लागते. कमी पाणी पिले तर लघवीला  जळजळ होणे, उलटी, डोके दुखी इत्यादी सारखे  त्रास जाणवतात. त्यामुळे उन्हाळयातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेमुळे आरोग्याबरोबर त्वचेवर सुद्धा परिणाम होतो. प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम होऊन त्वचा पोळली जाते व काळी पडण्याची शक्यता असते. उघड्या अन्नावरील विषाणू व विषाणूयुक्त पाणी यातून आजार जडतो. विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेमकी कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेणार आहोत.

काय केले पाहिजे? 

१. घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्या.
२. सुती, सैल आणि आरामदायी कपडे घाला.
३. ताजे अन्न खाल्यानंतर बाहेर पडा.
४. उन्हात बाहेर जाताना डोके झाका, टोपी, कपडा, छत्रीचा वापर करा.
५. पाणी, ताक, ओ.आर.एस.एल., पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबू पाणी, आंबा पन्ह, इत्यादी घरगुती पेयांचे सेवन करा.

काय करू नये?

१. रिकाम्या पोटी बाहेर पडू नका.
२. उन्हात अधिक वेळ बाहेर राहू नका.
३. तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका.
४. नेहमी पाणी सोबत ठेवा. कधीही पाण्याची कमतरता पडू देऊ नका.
५. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवा. कूलर किंवा एअर कंडिशनर मधून थेट उन्हात बाहेर पडू नका.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss