Thursday, April 25, 2024

Latest Posts

जाणून घ्या… आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या टोमॅटोचे फायदे

टोमॅटो म्हणताच आठवतो तो त्याचा लालबुंद रसरशीतपणा... भाजी, आमटी, भात, रस्सा सगळ्या पदार्थांची लज्जत वाढविण्यात टोमॅटो अग्रेसर आहे.

मुंबई :- टोमॅटो म्हणताच आठवतो तो त्याचा लालबुंद रसरशीतपणा… भाजी, आमटी, भात, रस्सा सगळ्या पदार्थांची लज्जत वाढविण्यात टोमॅटो अग्रेसर आहे. प्रत्येक घरात कांदे, बटाटे यांच्याबरोबर टोमॅटोदेखील आवर्जून आणलेला असतोच. सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.

अँटी ऑक्‍सिडन्ट्स, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन’ए’ व ‘सी’ यांनी समृद्ध, फॉलिक ऍसिड , पोटॅशियम, बीटा-कॅरोटिन, ल्युटिन, फॉलेट, व्हिटॅमिन बी-सहा इ. टोमॅटोमध्ये एक अतिशय गुणकारी असा महत्त्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे ‘लायकोपिन’. टोमॅटोचा लाल रंग या घटकामुळेच असतो.

  • सुंदर त्‍वचा :- टोमॅटोत लाईकोपीन नावाचे एक ऑक्‍सिड आसते. या ऑक्‍सिडमुळे त्‍वचेचे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. चेहऱ्यावरील काळ्या रंगाचे डाग घालिवण्यासाठी टोमॅटोचा फायदा होतो. त्‍वचेवर टोमॅटोची साल चोळल्‍याने त्‍वचेला चकाकी येते आणि चेहरा उजळ दिसतो.
  • हाडे मजबूत करण्यासाठी :- टोमॅटोत कॅल्शियम आणि विटामिन असल्‍यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी त्‍याचा चांगला फायदा होतो. टोमॅटोत लाईग्‍कोपीन नावाचे अँटी ऑक्सिडेंट असते त्‍यामुळे हाडांमघील मांस टीकवून ठेवण्यास मदत होते.
  • लांब आणि काळे केस :- टोमॅटोमधील विटामिन ए आणि लोह केसांची वाढ, केस काळे होणे, केस गळती थांबविणे, केस दाट येणे तसेच केस मजबूत होण्यासाठी फायदेशिर आहे. टोमॅटोमधील अम्‍ल केसांच्या काळ्या रंगासाठी उपयोगी ठरते, हे केसांचा रंग बदलू देत नाही.
  • हृद्यासंबंधित रोगांपासून बचाव होतो.
  • युरिन इन्फेक्शनपासून बचाव तसेच रक्तशुद्धी होते.
  • पाचनशक्ती वाढवते. पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
  • केसांना चमकदार तसेच मजबूच बनवण्यासाठीही टोमॅटो फायदेशीर आहे.
  • त्वचेला उजाळा मिळवून देण्यासाठी टोमॅटो खाणे चांगले.
  • बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्यास किडनी स्टोनची शक्यता कमी होते.

टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत. तुम्ही टोमॅटोचं सेवन ज्यूस, सूप, सॅलड कोणत्याही प्रकारे करू शकता. तसेच टोमॅटोच्या ज्यूसचे अनेक फायदे आहेत :-

  • जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो.
  • टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
  • टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.
  • टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं.

हे ही वाचा :-

जाणून घ्या… आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या टोमॅटोचे फायदे

Latest Posts

Don't Miss