Saturday, April 27, 2024

Latest Posts

जाणून घेऊया…. हसणं या व्यायामाबद्दल

'हसवणं' ही एक अवघड कला समजली जाते. 'लाफ्टर (हसणं) इज अ बेस्ट मेडिसिन असे समजले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली सर्व मनसोक्त केव्हा हसले होते ते देखील विसरून जातात.

मुंबई :- ‘हसवणं’ ही एक अवघड कला समजली जाते. ‘लाफ्टर (हसणं) इज अ बेस्ट मेडिसिन असे समजले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली सर्व मनसोक्त केव्हा हसले होते ते देखील विसरून जातात. हसणे हे सर्वांसाठी फारच महत्त्वाचे आहे, तरी ही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र केवळ कलाक्षेत्राचा भाग म्हणून विनोद आणि हास्य सीमित नसून हसण्याचे अनेक आरोग्यदायी देखील फायदे आहेत….

  • मोठ्याने हसल्याने रक्ताभिसरण चांगले होते.
  • सकाळी जर हास्य ध्यान योग केले तर दिवसभर आपण आनंदी राहतो. जर रात्रीच्या वेळी केले तर आपल्याला चांगली झोप लागते. सकाळी आनंदी राहण्याने ऑफिसचे वातावरण देखील आनंददायी होत. म्हणून मित्रांनो, आपण सर्वजण दोन किंवा चार चुटकुले वाचून आपल्या दिवसाची सुरुवात हसून करावी.
  • हास्य योगामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.
  • हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो.
  • हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. हसण्याने आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत होते.
  • आजकालच्या जीवनशैलीमुळे नकारात्मक विचार, भावना लगेच येतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता अधिक वाढते. मात्र हसल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो. हसल्याने आपल्या शरीरात इंडोर्फिन हार्मोन स्त्रवते आणि आपल्याला सकारात्मक वाटू लागते.
  • हसल्याने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे स्थुलता कमी होण्यास मदत होते. एक संशोधनानुसार, १५ मिनिटे हसल्याने १०-४० कॅलरीज बर्न होतात.
  • हसल्याने आपली श्वसनक्षमता सुधारते. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी वाढतो. एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र तयार करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.
  • वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.
  • आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. याच्यामुळे विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते.
  • हसणे हे एक पेन किलर आहे .

हसरा-खेळकर स्वभाव असणारी माणसे सर्वांनाच हवीहवीशी असतात. अशी माणसे स्वतः तर आनंदात राहतातच, पण आपल्या दिलखुलास व्यक्‍तिमत्त्वाने स्वतःच्या आसपासच्या लोकांनाही सकारात्मक राहण्यास मदत करतात. अगदी प्रत्येक वाक्‍यात विनोद करता आला नाही तरी चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवणे, समोरच्या व्यक्‍तीला स्वतःहून स्मित देण्याची तयारी असणे, एवढे तरी साध्य होणे अजिबात अवघड नाही. हसण्याची असे अनेक फायदे आहे. म्हणून लहानग्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच हसणे योग्य आहे.

हे ही वाचा :-

जाणून घ्या… आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या टोमॅटोचे फायदे

Latest Posts

Don't Miss