Saturday, July 27, 2024

Latest Posts

हिवाळ्यात मका खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर

हिवाळ्यात मका खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर

हिवाळा सुरु झाला की साधारण बहुतेक लोकांचे खाण्या-पिण्याचे चोचले सुरु होतात.बदलत्या ऋतुसोबत आपलं खाणं पिणं देखील बदलत असत.तर हिवाळ्यात थंड पदार्थ खाणं आपण जास्तीत जास्त टाळतो.दरम्यान मका म्हणजेच कणीस खायला सगळ्यांनाच खुप आवडत .खरतर कणीस जास्तीत जास्त पावसाळ्यात खाल्ला जातो.खरतर जगभरात कॉर्न या नावाने ओळखला जाणारा मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मक्यामध्ये प्रथिने, फायबर्स, फॅट्स आणि व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते, त्यामुळे, तर मक्याला सुपरफूड असे म्हटले जाते. मक्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. हे असे धान्य आहे की, जे जगभरात प्रसिद्ध आहे आणि लोकांच्या प्रचंड आवडीचे आहे. चवीला रूचकर आणि गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला मका हा आपल्याला आरोग्यासाठी  देखील अतिशय लाभदायी आहे.चला तर मग जाणुन घेऊयात मका खाण्याचे फायदे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मक्यामध्ये पोषकघटकांचे खुप जास्त प्रमाण आढळून येते. शिवाय, मक्या मधे  ‘व्हिटॅमीन सी’ मोठ्या प्रमाणात असतो. व्हिटॅमीन सी चा योग्य पुरवठा आपल्या शरीराला झाल्यावर हे व्हिटॅमीन सी संसर्गांशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना देखील बरे करते.त्यामुळे मका खाल्याने व्हिटॅमीन सी शरीराला मिळतो.

डोळ्यांसाठी आहे फायदेशीर

मका हा डोळ्यांसाठी देखील चांगला फायदेशीर ठरतो.मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही दोन प्रकारची महत्वाची संयुगे मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ही दोन्ही संयुगे ज्याला कॅरोटीनोइड्स असे म्हटले जाते, ही कॅरोटीनोइड्स आपल्या डोळ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि फायदेशीर आहेत.

त्वचेसाठी आणि केसांसाठी लाभदायी

मका हा त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खुप फायदेशीर आहे.मक्यामध्ये कर्बोदके, फॅट्स, प्रथिने, फायबर्स आणि महत्वपूर्ण जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, मक्याचे सेवन केल्यावर आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.मक्यातील पोषक घटक आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात. त्यासोबतच, मक्याचे सेवन करणे हे आपली त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या सर्व गोष्टींमुळेच तर मक्याला सुपरफूड असे म्हटले जाते.

पचनक्षमता सुधारते

मका हे आपल्या पचनसंस्थेसाठी अतिशय उत्तम आहे. मक्याचे सेवन केल्याने आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. शिवाय, पोटाच्या विविध समस्यांपासून देखील आराम मिळतो..त्यामुळे, हिवाळ्यात मक्याचे अवश्य सेवन करा. यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

हे ही वाचा:

‘सिंघम ३’च्या सेटवर अजय देवगनचा अपघात,चित्रपटाचं शूटिंग थांबलं

CM EKNATH SHINDE: हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा महापालिकेचे नाही तर हे सर्वांचे आहे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss