Wednesday, February 28, 2024

Latest Posts

CM EKNATH SHINDE: हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा महापालिकेचे नाही तर हे सर्वांचे आहे

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) हे वरळी (WORLI) परिसरात उपस्थित होते. यावेळी या मोहिमेत सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांनी परिसराची स्वच्छता केली. यावेळी वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौक येथे असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करून हा पुतळा पाण्याने धुवून काढला. यानंतर याच परिसरात सुरु असलेल्या नवीन इमारतींच्या बांधकामामध्ये बाहेर धूळ उडू नये, यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मुंबई मनपाचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी येथील माता रमाई चौकात जाऊन माता रमाई यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर जिजामाता नगर येथील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यानंतर वरळी येथील बेलासीस रोडवर सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी झाले असता, एका मुस्लीम व्यक्तींनी येऊन या कामाबद्दल सरकारचे कौतुक केले. तेव्हा त्यांनाही या कामात हातभार लावण्याची विनंती करून स्वच्छता कामगारांच्या साथीने हा मार्ग मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्णपणे स्वच्छ केला. नायगाव, गांधी चौक येथील रस्त्यांच्या स्वच्छतेबरोबरच पदपथांची, शौचालयांची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा महापालिकेचे नाही तर हे सर्वांचे असून जनतेने या अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या अभियानाचे दृश्य परिणाम आपल्याला लवकरच दिसतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

बेलासिस रोडकडे जाताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या कारशेड तसेच बस आगाराजवळ थांबून स्वच्छतेची पाहणी केली. तसेच, स्वच्छता मोहिमेतील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या. यावेळी नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त होण्यासाठी संपूर्ण स्वच्छता (Deep Clean) मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी हे खरे ‘हिरो; असून त्यांची या मोहिमेच्या यशस्वीतेत प्रमुख भूमिका आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. येत्या काळात राज्यातील विविध शहरांत स्वच्छतेचा हा ‘मुंबई पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

Christmas 2023: जगातल्या जुन्या चर्चमध्ये ६ जानेवारीला होते Christmas Celebration

ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या मृत्यूप्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss