Saturday, March 2, 2024

Latest Posts

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

हिवाळा सुरु होताच ख्रिसमस या सणाची चाहूल लागते.त्यात डिसेंबर महिना आला की सेलिब्रेशनची लगबग सुरु होते.आणि त्यात नवीन वर्षाची आतुरता देखील असते.

Christmas 2023: हिवाळा सुरु होताच ख्रिसमस या सणाची चाहूल लागते.त्यात डिसेंबर महिना आला की सेलिब्रेशनची लगबग सुरु होते.आणि त्यात नवीन वर्षाची आतुरता देखील असते.अर्थात नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. अशातच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रेशनचे तुमचेही काही प्लॅन्स असतील.कारण विकेंन्ड असल्यामुळे तुम्ही कुठे सेलिब्रेट करणार हे आधिच प्लॅन केलेलं असतं.मात्र तुम्हाला माहिती आहे का? मुंबई बाहेर असे काही खास ठिकाण आहेत तिकडे मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो.आणि या जागा फिरण्यासाठी आणि सेलिब्रेशनसाठी एकदम परफेक्ट असतील. या ठिकाणी तुम्ही ख्रिसमस अगदी आनंदाने साजरा करू शकता. तर आपण जाणून घेऊयात की ख्रिसमस कुठे खास पद्धतीत साजरा केला जातो.

गोवा (Goa)

गोवा म्हंटल तर आता तरुणाईची आवडती जागा,तरुणाईचं नाही तर प्रत्येक वयोगटातील लोकं तिकडे सेलिब्रेशनसाठी जात असतात.दरम्यान गोव्यात नेहमीच काही ना काही उत्सव होत असतात. पण डिसेंबरमध्ये गोवा हा अनेक अर्थाने खास आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दूरदूरवरून पर्यटक येथे येतात आणि नवीन वर्षानंतर तेथून निघून जातात. गोव्यात नाईट लाईफ वेगळी आहे, पण इथे ख्रिसमसही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या काळात केवळ चर्चच नाही तर रस्त्यांवर आणि इमारतींवरही रंगीबेरंगी दिवे दिसतात.म्हणजेच काय गोव्यामध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होतो.

पाँडिचेरी (Puducherry)

पाँडिचेरी हे भारताचे “लिटल फ्रान्स” असेही म्हणतात. फ्रेंच लोकांनी येथे दीर्घकाळ राज्य केले. याठिकाणाची लोक्यालिटी जास्त प्रमाणात ख्रिश्चन लोकांची आहे. त्यामुळे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुम्ही ख्रिसमस लाँग वीकेंडमध्ये येथे येण्याची योजना करू शकता. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भूत ठिकाणे आहेत.

सिक्कीम (Sikkim)

ईशान्य सिक्कीममध्ये येऊन तुम्ही ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. डिसेंबर महिन्यात सिक्कीममध्ये खूप थंडी असते, इथे ख्रिसमसचा सण खूप छान साजरा केला जातो.दिवे,लाईटिंग,फटाक्यांची आतषबाजी अशा पद्धतीत धुमधडाक्यात ख्रिसमस साजरा केला जातो.

केरळ (Kerala)

केरळ हे भारतीयांचे सर्वात आवडते शहर आहे. लोक इथे लोकांची सतत भेट ये-जा होत असते,फिरण्यासाठी उत्तम ठिकाण असलेल्या या केरळमध्ये ख्रिसमस हा सण मोठ्या दिमाकात साजरा केला जातो,दरम्यान  येथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात.त्यामुळे या उत्सवाची भव्यता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक चर्चमध्ये पाहायला मिळेल.ख्रिसमस हा सण केरळमधील लोकांसाठी खुप खास असतो.

हे ही वाचा:

महिलांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यव्यापी दौरा, सुप्रिया सुळे

‘2018’ भारताच्या ऑस्कर निवडीतून बाहेर,दिग्दर्शकाच्या पदरी अपयश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss