Saturday, May 18, 2024

Latest Posts

नाताळ्या सुट्टीत फिरण्यासाठी ठिकाण शोधताय,मग, ‘या’ हिलस्टेशन्सला नक्की भेट द्या

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे.थंडीची चाहुल देखील आता हळुहळु जाणवु लागली आहे.याच महिन्यात २५ तारखेला ख्रिसमस देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे.थंडीची चाहुल देखील आता हळुहळु जाणवु लागली आहे.याच महिन्यात २५ तारखेला ख्रिसमस देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसची नुसतीच धामधूम पहायला मिळते. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक घरांची सजावट करतात. ख्रिसमसची खास शॉपिंग करतात. घरोघरी विविध प्रकारचे केक बनवले जातात आणि लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. ख्रिसमसचा हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.ख्रिसमसनिमित्त लॉंग विकेंड देखील असतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये लोक आपल्या फॅमिलीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. या वर्षी ख्रिसमसनिमित्त तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करणार असाल,तर जाणुन घ्या या ठिकाणांची नावे. तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नैनिताल

उत्तराखंड राज्यातील नैनिताल हे सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. नैनिताल हे ठिकाण उंच पर्वातांमध्ये वसले असून, येथील निसर्गाचा नजारा पाहण्यासारखा असतो. खास करून हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी देखील होते. त्यामुळे, बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देखील पर्यटकांची येथे गर्दी असते.नैनिताल येथील नैनी झील, नैना देवी मंदिर, सरिता तलाव, हनुमान गढी आणि अन्य पर्यटन स्थळांवर तुम्ही भेट देऊ शकता.

मसूरी

उत्तराखंड राज्यातील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मसूरी होय. या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. या सुंदर परिसरात अनेक चित्रपटांचे-मालिकांचे आतापर्यंत शूटिंग झाले आहे. या परिसरात नेहमीच शूटिंग होत असतात. मसूरीमध्ये तुम्ही मॅगी पॉईंट, मसूरी लेक, मॉल रोड, केम्पटी फॉल्स आणि अन्य ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हिवाळ्यात येथे ही बर्फवृष्टी होते. येथील साहसी खेळांचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता.

मनाली

मनाली हे ठिकाण आता सर्वांनाच माहित आहे. हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून मनालीची खास ओळख आहे. मनालीमध्ये तुम्ही अनेक बर्फातील साहसी खेळांचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.मनालीमध्ये तुम्ही मॉल रोड, हिडिंम्बा मंदिर, मनुमंदिर, सोलंग व्हॅली इत्यादी अनेक पर्टयन स्थळांना भेट देऊ शकता. येथील नयनरम्य परिसर पर्यटकांचे खास लक्ष वेधून घेतो.

हे ही वाचा:

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु

रविकांत तुपकरांचा एकनाथ शिंदें यांच्यावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

 

 

Latest Posts

Don't Miss