Saturday, March 2, 2024

Latest Posts

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर डॅरेल मिचेल याच्यावरही १४ कोटींचा पाऊस पडला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल याच्यासाठी पंजाब किंग्सने मोठी बोली लावली. पंजाब किंग्सने हर्षल पटेल याला ११. ७५ कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. हर्षल पटेल याला बेस प्राईजपेक्षा जवळपास सहा पट अधिक रक्कम मिळाली आहे. हर्षल पटेल याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्याच्यासाठी प्रिती झिंटाच्या पंजाबने ११. ७५ कोटी रुपये खर्च केले. हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी बिडिंग केली, पण अखेर पंजाब किंग्सने बाजी मारली.

याआधी हर्षल पटेल आरसीबी संघाचा सदस्य होता. पण आरसीबीने त्याला रिलिज केले. त्याला २०२३ मध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल २०२३ लिलिवात आरसीबीने त्याला १०. ७५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलमध्ये हर्षल पटेल याने आरसीबीशिवाय दिल्ली आणि मुंबई संघामध्ये खेळला आहे. यंदा हर्षल पटेल पंजाबच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

अष्टपैलू हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाब संघामध्ये लढत झाली. प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने हर्षल पटेल याला ११ कोटी ७५ लाख रुपयांत खरेदी केले. हर्षल पटेल याने ८९ आयपीएल सामन्यात १११ विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तो तळाला फलंदाजी करण्यातही तरबेज आहे.

हर्षल पटेल याला बेस प्राईजपेक्षा जवळपास सहा पट अधिक रक्कम मिळाली आहे. हर्षल पटेल याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्याच्यासाठी प्रिती झिंटाच्या पंजाबने ११. ७५ कोटी रुपये खर्च केले. हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी बिडिंग केली, पण अखेर पंजाब किंग्सने बाजी मारली.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss