Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Budget Friendly Honeymoon Destination शोधताय? घरबसल्या बघा ‘ही’ यादी

सध्या सगळीकडेच लगीन सराई हे जोडतात सुरू आहे. लगीन सराई ही सुरू झाली की प्रत्येक जोडपं हे त्यांची तयारी देखील सुरू करतात.

Honeymoon Places in India : सध्या सगळीकडेच लगीन सराई हे जोडतात सुरू आहे. लगीन सराई ही सुरू झाली की प्रत्येक जोडपं हे त्यांची तयारी देखील सुरू करतात. या तयारी सोबतच प्रत्येक जोडपं (Couples) हे त्यांच्या हनिमूनची (Honeymoon) देखील तयारी करत असतं. सध्या सगळेच जोडपे हे हनिमून साठी परदेशात म्हणजेच लंडन, बँकॉक, थायलंड (London, Bangkok, Thailand) अशा ठिकाणी आवर्जून भेट देतात सध्या हा ट्रेंड सुरू आहे. परंतु आपल्या भारतात देखील असे काही हनिमून डेस्टिनेशन्स आहेत त्यांना तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता अर्थात हे डेस्टिनेशन्स अगदी बजेट फ्रेंडली देखील आहेत. तुम्ही देखील भारतातील बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन हनिमून साठी शोधत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

गोवा (Goa) – ज्यांना हनिमूनसाठी परदेशात गेल्यासारखा फिल हवा असेल तर तुम्ही हनिमूनच्या ठिकाणांच्या यादीत सर्वात आधी म्हणजेच पहिल्या पहिल्या क्रमांकावर गोवा हे नाव नमूद करा. नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी गोव्याला कायम प्राधान्य देतात. बीचवर आपल्या जोडीदारासोबत सुंदर सनसेट पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी खेळही खेळू शकता. हा अनुभव जोडप्यांसाठी रोमँटिक आणि अॅडव्हेंचेरस ठरेल.

जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) – जम्मू आणि काश्मीर हे एक बर्फाच्छादित पर्वत, हिरवेगार सुंदर दऱ्या, सुंदर तलाव, या सर्व प्रेक्षणीय स्थळांमध्ये जोडीदारासोबत वेळ घालवणे म्हणजे जणू स्वर्गच. भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणारं जम्मू-काश्मीर हनिमूनसाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. तुम्ही हनिमूनचा प्लान करत असाल तर, जम्मू-काश्मीरमध्ये येऊन तुम्ही दल लेक, गुलमर्ग, पहलगाम सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचसोबत जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ २,२२,२३६ चौरस किमी इतके आहे. जम्मू आणि काश्मिरचा दक्षिणोत्तर विस्तार ६४० किमी. व पूर्वपश्चिम विस्तार ४८० किमी. आहे. याच्या सीमांवर पूर्वेस तिबेट, ईशान्येस सिंक्यांग, उत्तरेस सिंक्यांग व अफगाणिस्तान, पश्चिमेस पाकिस्तान आणि दक्षिणेस पंजाब व हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत.

केरळ (Kerala) – पुढील ठिकाण म्हणजे केरळ. जर तुम्ही लग्नानंतर हनिमून प्लॅन करत असाल तर तुमच्या सर्वोत्तम डेस्टिनेशनच्या यादीत केरळचा समावेश नक्की करा. तुमच्या लाइफ पार्टनरसोबत केरळमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. नैसर्गिक सौंदर्यासोबतच केरळमध्ये वैदिक स्पा, ट्री हाऊस अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

 

माउंट अबू (Mount Abu) – राजस्थानचे नंदनवन म्हटल्या जाणार्‍या माउंट अबू हे हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. हे जणू भारतातील हिडन जेम आहे, असं म्हणावं लागेल, कारण येथील निसर्ग सौंदर्य मनाला भूरळ पाडते. माउंट अबू हे जास्त वर्दळ नसलेलं बेस्ट हनिमून डेस्टिनेशन आहे. हे जोडप्यांसाठी सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे.

हे ही वाचा:

शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss