Saturday, July 27, 2024

Latest Posts

 गाजराच्या साली पासून बनवा ‘हे’ खास पदार्थ,जाणुन घ्या फायदे

हिवाळा सुरु असल्यामुळे बाजारात गाजर हे स्वस्त दरात मिळत आहेत.हिवाळ्यात, लोक स्वस्त आणि ताज्या गाजरांपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवतात.

हिवाळा सुरु असल्यामुळे बाजारात गाजर हे स्वस्त दरात मिळत आहेत.हिवाळ्यात, लोक स्वस्त आणि ताज्या गाजरांपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवतात.गाजरा पासून गोड खिर बनवली जाते ,तसेच गाजराचा हलवा देखील बनवला जातो.हिवाळ्यात भुक देखील वाढते त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ घरी बनवत असतो.तसचं गाजरापासून कोशिंबीर,तसेच गाजराचा ज्यूस हे सगळ बनवलं जात,तसचं गाजरापासून बनवलेल्या गोष्टी या तितक्याच पोष्टिक देखील असतात. लोकांना गाजराची भाजीही खूप आवडते. पण गाजर कापण्यापूर्वी लोक त्याची साल काढून फेकून देतात. मात्र गाजराची साल फेकून देण्याऐवजी त्यांचा अनेक मार्गांनी पुन्हा वापर केला जाऊ शकतो.गाजराच्या सालीचे अनेक पदार्थ आहेत. जे सहज बनवता येऊ शकतात. जे चविष्ट तर लागतातच पण त्यासोबत पौष्टीकही होतात.जाणुन घेऊयात गाजराच्या सालीपासून बनवण्यात येणारे पदार्थ..

चिप्स बनवा

गाजराच्या सालीपासून चिप्स बनवता येतात.गाजर सोलल्यानंतर साल फेकून देण्याऐवजी, स्वच्छ पाण्याने धुवा, कपड्याने पुसून टाका आणि कोरडे राहू द्या. चाकूच्या साहाय्याने गाजराच्या सालीचे २-२ इंच तुकडे करा, तेल लावा, मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो शिंपडा आणि एअर फ्रायरमध्ये तळून घ्या. चविष्ट कुरकुरीत चिप्स सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

सूप बनवा

सूप बनवण्यासाठी तुम्ही गाजराची साल देखील वापरू शकता. सूप बनवण्यापूर्वी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्या. सालीमध्ये पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये उकळवा. आता एका कढईत काढून चांगले शिजवून घ्या. चवीनुसार मिरपूड आणि साखर घाला आणि गरम सर्व्ह करा. हवे असेल तर त्यात तूम्ही कॉर्न पीठ सुद्धा घालू शकता. ज्यामुळे या सूपला दाटसरपणा येईल.

गार्निश करण्यासाठी वापरा

सॅलड किंवा इतर पदार्थ सजवण्यासाठी गाजराची साल वापरा. साल धुवून बारीक चिरून घ्या आणि नंतर सॅलड वर पसरवा. ज्यामुळे मुलंही कलरफुल सॅलड पाहून खूश होतील.

मिठाई बनवा

गाजराच्या सालीपासून मुलांसाठी कँडीज बनवता येतात. गाजराची साल नीट धुवा, वाळवा आणि एका पॅनमध्ये साखरेचा पाक तयार करा. गाजराची साल जाडसर पाकात बुडवून प्लेटमध्ये ठेवा, बेक करा आणि मुलांना सर्व्ह करा.

दुध गाजराचा करा प्रयोग

गाजराची साल धुवून बारीक चिरून घ्या. कापल्यानंतर, दोन ग्लास दुधात उकळण्यासाठी सोडा. दूध आणि गाजराची साले उकळून घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड टाका आणि थोडा वेळ शिजवा. सर्व काही चांगले शिजले की नीट मिक्स करून सर्व्ह करा.

हे ही वाचा:

सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय,दहावीला तीन, बारावीला दोन भाषा असणे बंधनकारक

आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या, ठाकरे गटाचे सूचक वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss