Thursday, February 29, 2024

Latest Posts

Christmas साठी केक बनवताय? त्याच सिक्रेट माहितेय? जाणून घ्या केक मिक्सिंगविषयी…

ख्रिसमस केक हा लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ. ख्रिसमसच्या आधी अनेक हॉटेलांमध्ये केक मिक्सिंग (Cake Mixing Ceremony) समारंभ आयोजित केले जातात. केकमध्ये (Cake) वापरले जाणारे घटक एकत्र करण्यासाठी- मिसळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं सहभागी होतात.

ख्रिसमस केक हा लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ. ख्रिसमसच्या आधी अनेक हॉटेलांमध्ये केक मिक्सिंग (Cake Mixing Ceremony) समारंभ आयोजित केले जातात. केकमध्ये (Cake) वापरले जाणारे घटक एकत्र करण्यासाठी- मिसळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं सहभागी होतात. या केकचे अनेकांना आकर्षण असते. पण, ख्रिसमसच्या (Christmas) आधी केक मिक्सिंगची सुरूवात १७ व्या शतकात झाली असून ही खूप जुनी पद्धत आहे. केक मिक्सिंग म्हणजे काय आणि त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.

१७ व्या शतकात डिसेंबरमधअये केक मिक्सिंग (Cake Mixing) केले जात असे. मात्र केक तयार करण्याची पद्धत फार बदलली नाही. ही परंपरा प्रत्यक्षात युरोपमध्ये सुरू झाली. संपूर्ण कुटूंब यानिमित्ताने एकत्र येत असल्याने एकता आणि कठोर परिश्रम यांचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. केक मिस्क केल्यावर ते मिश्रण अल्कोहोलमध्ये भिजवून आठवडा-१५ दिवस तसेच ठेवले जाते. केक मिक्स हे पूर्वीच्या काळी गिफ्ट म्हणून देण्याची पद्धत होती. लोक केकच्या रेसिपी स्वत: तयार करून नातेवाईकांना दाखवत असत.

केक मिक्सिंग म्हणजे काय? (What is cake mixing?)

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केक मिक्सिंगची (Cake Mixing) सुरूवात केली जाते. ही पारंपारिक पद्धत आहे. ज्यात भरपूर प्रमाणात सुका मावा, नट्स, मसाले, धान्य एकत्र करून मिश्रण तयार केले जाते. नंतर काही दिवस हे मिश्रण रम किंवा तत्सम अल्कोहोलयुक्त मिश्रणात भिजवून ठेवतात. ज्यामुळे सर्व पदार्थांची चव आणि सुगंध एकमेकांत मिसळून चव तयार होईल. शेवटी हे घटक केक बेटरमध्ये गरजेनुसार विभागले जातात. त्यातूनच पुढे ख्रिसमस केल बेक केले जातात. अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा दिवस एका सोहळ्यासारखा आयोजित केला जातो.

केक मिक्समध्ये कोणते पदार्थ असतात? (What goes into the cake mix?)

केक मिक्स करण्यासाठी बदाम, काजू, मनुका, खजूर, अंजीर, वाळलेल्या चेरी, पिस्ता, (Dryfruits) दालचिनी, लवंगा, जायफळ, वाळलेले आले, मिठाईयुक्त फळे, प्रून, अक्रोड, साखर, अंडी, मैदा हे घटक योग्य प्रमाणात एकत्र केले जातात. चांगले एकत्र केल्यावर, हे मिश्रण नंतर रम, ब्रँड, वाइन किंवा फळांचे रस आणि अल्कोहोल यांच्या मिश्रणात भिजवले जाते. नंतर हे केक मिक्स हवाबंद डब्यात भरले जाते आणि किमान एक आठवडा भिजवून ठेवले जाते. अल्कोहोल हे प्रिझर्व्हेटिव्ह असल्याने मिश्रण जास्त काळ टिकते. केकचे मिश्रण वर्षभर टिकवून ठेवल्याने तुमचे नशीब फळफळते तसेच दुसऱ्यांशी आकर्षित सुसंवाद होऊ शकतो, असे म्हटले जाते.

हे ही वाचा : 

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss