Friday, April 19, 2024

Latest Posts

यंदा Valentine’s Day च्या या खास प्रसंगी तुमच्या जोडीदाराला द्या हटके शुभेच्छा….

व्हॅलेंटाईन वीक संपल्यावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे च्या या खास प्रसंगी, हा खास प्रेम संदेश तुमच्या लव्ह पार्टनर किंवा लाइफ पार्टनरला पाठवा आणि त्यांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा द्या.

Valentine’s Day 2024 : फेब्रुवारी महिना चालू झाला आहे आणि व्हॅलेंटाईन डे सुरु झाले आहेत. दरवर्षी ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत (14 February) जगभरात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या वीकसाठी तरुण मित्र मंडळी जोरदार तयारी करतात. सलग एक आठवडा चालणार हा व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) एका सणाप्रमाणे साजरा केला जातो. या वीकमध्ये विविध दिवशी विविध डे साजरे केले जातात. रोज डे, चॉकलेट डे असे आठवडा भर वेगवेगळे डे साजरे केले जातात. तर व्हॅलेंटाईन वीक संपल्यावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे च्या या खास प्रसंगी, हा खास प्रेम संदेश तुमच्या लव्ह पार्टनर किंवा लाइफ पार्टनरला पाठवा आणि त्यांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा द्या. हा दिवस लव्ह बर्ड्ससाठी खूप खास आहे आणि तुम्ही हे मेसेज, कोट्स शेअर करून दिवस अधिक सुंदर बनवू शकता.

प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही
प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे
कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही
तर ही जन्मोजन्मीची राहू दे….

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये जणू
गुलाबाची कळी फुलली..!

अरमान कितने भी हो,
आरज़ू तुम ही हो,
गुस्सा कितना भी हो,
प्यार तुम ही हो.
हैप्पी वैलेंटाइन डे डियर !

ज्याच्याजवळ माझ्या हृदयाची किल्ली आहे, ज्याचे प्रेम माझे मार्गदर्शक आहे, त्या माझ्या सर्वस्व असणाऱ्याला व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुझ्या प्रेमात पडणे ही मी आतापर्यंत केलेली सर्वात सोपी गोष्ट आणि मी केलेली सर्वोत्तम निवड आहे. माझ्या फॉरेव्हर व्हॅलेंटाईनला Happy Valentine Day!

रोज माझे हृदय चोरणाऱ्या माणसासाठी हा खास संदेश आहे. तुझे प्रेम हे माझ्या जगण्याचा ध्यास आहे. Happy Valentine’s Day my sweetheart!

हे ही वाचा : 

भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर Ashok Chavan यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘भूल भूलैया ३’ मध्ये मंजुलिका येणार परत,विद्या बालनची चित्रपटात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss