Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Royal Enfield Hunter 350 : १.५० लाखांपासून रॉयल एनफिल्ड हंटर ३५० लाँच

बाईक आणि कार या गोष्टीसाठी तरुणाई वर्ग हा मोठ्या प्रमाणत चाहता असतो. अनेक नागरिकांना रॉयल एनफिल्ड या बाईक्स मोठ्या प्रमाणात आवडत असतात.

मुंबई :- बाईक आणि कार या गोष्टीसाठी तरुणाई वर्ग हा मोठ्या प्रमाणत चाहता असतो. अनेक नागरिकांना रॉयल एनफिल्ड या बाईक्स मोठ्या प्रमाणात आवडत असतात. आणि यातच आता रॉयल एनफिल्ड ने काल त्यांच्या हंटर ३५० या त्यांच्या मोटारबाईकची किंमत ही वाजवी दारात लाँच केली आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर ३५० ही रोडस्टर शैलीतील मोटरसायकल आहे आणि रॉयल एनफिल्डच्या लाइन अपमधील नवीन प्रवेश बिंदू आहे. हंटर ३५० रेट्रो आणि मेट्रो या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. रेट्रो ‘फॅक्टरी सीरीज’ म्हणून येते, तर मेट्रो ‘डॅपर सीरिज’ आणि ‘रिबेल सीरीज’ या दोन रूपात येते,

हंटर ३५० रेट्रो व्हेरिएट ची किंमत ही १,४९,९०० रुपये आहे. त्याचवेळी हंटर ३५० मेट्रो व्हेरिएन्ट डॅपर सीरीजची किंमत १,६३,९०० रुपये आहे. टॉप व्हेरियंटमध्ये, हंटर ३५० मेट्रो रिबेल व्हेरियंटची किंमत १,६८,९०० रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम चेन्नईच्या किमती आहेत. तर हंटर ३५० रेट्रो व्हेरियंट फॅक्टरी ब्लॅक आणि फॅक्टरी सिल्वर सारख्या कलर पर्यायांमध्ये ऑफर केले जात आहे. तर त्याच वेळी टर 350 मेट्रो डॅपर मालिका डॅपर व्हाईट, डॅपर ॲश आणि डॅपर ग्रे सारख्या कलर पर्यायांमध्ये सादर केली गेली आहे. हंटर 350 मेट्रो रिबेल हे रेबेल ब्लॅक, रिबेल ब्लू आणि रिबेल रेड या रंगांमध्ये सादर करण्यात आले आहे. आता ही बाईक कंपनीच्या ३५० सीसी सेगमेंटच्या सर्वात स्वस्त मोटारसायकलच्या यादीत सामील झाली आहे.

नवीन RE Hunter 350 ची रचना रेट्रो-शैलीमध्ये केली गेली आहे. ज्यामध्ये गोल हेडलॅम्प, गोलाकार टर्न इंडिकेटर, IRVM आणि टेललाइट्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे क्रूझरपेक्षा रोडस्टरसारखे दिसते. बाइकला टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आणि बॅक फूट पेग्स मिळतात जे क्लासिक 350 पेक्षा अधिक स्पोर्टी राइडिंग पोझिशन देतात. तुम्ही इंधन टाकीवर रॉयल एनफील्ड बॅज पाहू शकता. बाइकला टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आणि बॅक फूट पेग्स मिळतात जे क्लासिक ३५० पेक्षा अधिक स्पोर्टी राइडिंग पोझिशन देतात. तुम्ही इंधन टाकीवर रॉयल एनफील्ड बॅज पाहू शकता.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० मोटारसायकलचा प्रकार आणि किंमत :-

  • रॉयल एनफील्ड हंटर रेट्रो फॅक्टरी सिरीज – रु. १,४९,९००
  • रॉयल एनफील्ड हंटर मेट्रो डॅपर सिरीज – रु. १,६३,९००
  • रॉयल एनफील्ड हंटर मेट्रो रिबेल सिरीज – रु. १,६८,९००

हे ही वाचा :-

संजय राऊतांनी कोठडीतून लेख कसा लिहिला ? ईडी करणार आता रोखठोक चौकशी

Latest Posts

Don't Miss