Saturday, April 27, 2024

Latest Posts

संजय राऊतांनी कोठडीतून लेख कसा लिहिला ? ईडी करणार आता रोखठोक चौकशी

मुंबई : पत्राचाळ आर्थिक घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहेत. आज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी 6 ऑगस्ट रोजी ईदीकडून चोकशी करण्यात आली. संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहे. त्यातच आता संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा लेख छापून आला होता. आणि हा लेख संजय राऊत यांनी कसा लिहिला याची चौकशी आता ईडीकडून करण्यात येणार आहे.

ईडीच्या सांगितलेल्या नियमानुसार कोठडीत असताना राऊत कॉलम किंवा लेख लिहू शकत नाहीत, जोपर्यंत न्यायालयाने विशिष्ट परवानगी दिली नाही टो पर्यंत असा कोणताही लेख त्यांना लिहिता येणारा नाही, आणि त्यांना अशी कोणतीही परवानगी न्यायालयाकडून देण्यात आलेली नाही.

संजय राऊत यांनी लिहिल्या सदरात त्यांनी राज्यचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचा निषेद करत राज्यपालांवर निशाना साधला आहे. त्यांनी म्हटले कि, ‘गुजराती व मारवाडी समाजचे लोक मुंबईत आहेत म्हणून मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती व मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही.’ राज्यपालांचे हे विधान निर्हेतुक कसे असेल? मुंबईतील गुजराती व मारवाडी समाजाच्या लोकांनाही श्री. कोश्यारी यांचे विधान आवडले नाही व त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करताच ज्यांचे पित्त खवळले, त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा एक अपमानच आहे,” असा संताप संजय राऊतांनी लिहिलेल्या आपल्या लेखातून व्यक्त केला आहे.

पुढे त्यांनी म्हटले,”साखर कारखाने, कापड गिरण्या आणि मराठी लोक चालवलेले इतर उद्योग ईडीने बंद केले आहेत आणि मराठी उद्योजकांभोवती केसेसचे जाळे टाकले आहे. राज्यपालांनी याबद्दलही बोलले पाहिजे.” असे संजय राऊतांनी आपल्या लिखाणातून म्हटले.

हेही वाचा : 

टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे, मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Latest Posts

Don't Miss