spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

2024 या वर्षात आहेत भरपूर Long Weekends…, तर आताच करा फिरायला जायचे नियोजन

२०२३ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तर सध्या २०२४ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत.

Long Weekends In 2024 : २०२३ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तर सध्या २०२४ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत. तसेच काही पर्यटक अजून विचार करत असतील. २०२४ या नवीन वर्षात एक दोन न्हवे तर भरपूर सुट्ट्या या लागोपाठ आहेत. नवीन वर्ष सुरु होण्याच्या आधीच आपण सगळे जण विचार करत असतो कि आता या वर्षात काय करायचे किंवा कुठे फिरायला जायचं? मग आपण अश्यावेळेस लागोपाठ सुट्ट्या नेमक्या कधी आहेत याच नियोजन करत असतो. म्हणजे लागोपाठ ३-४ दिवस सुट्ट्या आल्या की मनोसक्त लॉन्ग वीकएंड ट्रिप ही करता येते. तर लागोपाठ सुट्यांचे दिवस कसे असतील जाणून घेऊयात…

१५ जानेवारी – पोंगल – मकर सक्रांती (Pongal – Makar Sankranti)

पोंगल हा सण प्रामुख्याने तामिळनाडू (Tamilnadu), आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये या सणाचे महत्व सर्वात जास्त आहे. पण जर का तुम्हाला ऑफिस मधून पोंगलसाठी सुट्टी मिळाली तर तुम्ही लाँग विकेंडवर नक्कीच जाऊ शकता. तर मराठी नागरिकांचा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर सक्रांती. यांच्या वर्षी मकर सक्रांती ही १५ जानेवारी रोजी आली आहे. तुम्हाला मित्रांसमवेत अथवा कुटुंबियांसोबत ट्रीपसाठी जायचे असेल तर तुम्ही योजना आखू शकता. १५ जानेवारी म्हणजेच सोमवारी हे दोन्ही सण आले आहेत. १४ जानेवारीला रविवार असणार आहे. तर १३ जानेवारीला शनिवार आला आहे. तुम्ही या सुट्यांचा आनंद घेऊ शकता.

८ मार्चला – महाशिवरात्र (Mahashivratri)

२०२४ या वर्षात महाशिवरात्र हा सण ८ मार्च रोजी आहे. तर ८ मार्च हा दिवस शुक्रवारी येतो. म्हणजे अगदी वीक एन्ड आहे. पुढे शनिवार रविवार असल्यामुळे तुम्ही ३ दिवस या सुट्ट्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता. शिवाय, तुम्ही महशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाच्या निमित्तीने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना भेटी देऊ शकता.

२९ मार्च – गुड फ्रायडे (Good Friday)

नवीन वर्षात गुड फ्रायदे (Good Friday) २९ मार्चला असणार आहे. शिवाय ३१ मार्चला रविवार असल्यामुळे ती ही सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये मित्रांसोबत ट्रीपला जाण्याचा प्लॅन करु शकता.

१ नोव्हेंबर – दिवाळी (Diwali)

दिवाळी (Diwali) हा सण २०२४ या वर्षात १ नोव्हेंबरला असणार आहे. यानंतर एक दिवस सोडून रविवार आला आहे. ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे जोरादार सेलिब्रेशन करु शकतात. शिवाय, दिवाळीत येणाऱ्या विकेंडमध्ये तुम्ही आरामही करु शकता.

१५ नोव्हेंबर – गुरुनानक जयंती (Guru Nanak Jayanti)

दिवाळीनंतर काही दिवासांनी गुरुनानक जयंती आहे. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असणार आहे. यादिवशी शुक्रवार आहे. तर लगेच 17 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे एक दिवस सोडून सुट्या मिळणार आहेत.

२५ डिसेंबर – ख्रिसमस – (Christmas)

२०२४ च्या शेवटी २५ डिसेंबरला ख्रिसमसची (Christmas) सुट्टी मिळणार आहे. २१ डिसेंबरला शनिवार आहे. तर २२ डिसेंबरला रविवार आला आहे. यानंतर २३ डिसेंबरला म्हणजे मंगळवारी सुट्टी आहे. तुम्हाला ख्रिसमसमुळे ५ दिवसांचा मोठा विकेंड मिळू शकतो.

हे ही वाचा:

शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss