Tuesday, April 16, 2024

Latest Posts

डाळिंबाच्या सालीचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकता. त्याचा आरोग्याला फायदा होतो. रक्त शुद्ध करण्यासाठी,कोलेस्ट्रॉल नियंत्रित राखण्यासाठी डाळिंब खाल्ले जाते. डाळिंबाचे दाणे, बी आणि डाळिंबाचा रस या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीराला फायदा होतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का कि डाळिंबीच्या सालीचा देखील आरोग्यासाठी वापर केला जातो? डाळिंबाच्या दाण्यांप्रमाणे डाळिंबीची साल गुणकारी आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून सुटका मिळवण्यासाठी आणि त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा वापर केला जातो. अनेकदा ही साल आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो, पण ही साल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आयुर्वेदामध्ये या सालीचे अनेक फायदे आहेत. डाळिंबाची साल फळांप्रमाणे शरीरावर काम करते. त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. शरीरामध्ये ऑक्सीडेटिव्ह तणाव हा धोकादायक असतो. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. या सालीमध्ये पॉलिफेनोल्स आणि फ्लेवोनोईड्स यांसारख्या एन्टीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील सूज आणि तणाव कमी करण्यासाठी डाळिंबाची साल फायदेशीर आहे.

डाळिंबाच्या सालीमध्ये एन्टीऑक्सिडेंट सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. क्रॉनिक सूजशी संबंधित परिस्थिती जुळण्यास मदत करतात. डाळिंबच्या सालीचे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डाळिंबाची साल फायदेशीर आहे. या सालीमध्ये असणाऱ्या न्टीऑक्सिडेंट्स यूवी किरणांपासून नुकसान होण्यापासून वाचवतात. डाळिंबाच्या सालीची सुकवून पावडर बनवून वापर केला जातो.

हे ही वाचा:

विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प, विजय वडेट्टीवार यांचे केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र

रोहित पवार म्हणाले, व्यवसायात कोणतीही चुकीची गोष्ट…, तर चौकशी दरम्यान प्रतिभा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss