Saturday, July 27, 2024

Latest Posts

रोहित पवार म्हणाले, व्यवसायात कोणतीही चुकीची गोष्ट…, तर चौकशी दरम्यान प्रतिभा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांना ईडीने आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते तसेच ईडी विरोधात आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन स्थगित करावे अशी विनंती रोहित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांना ईडीने आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते तसेच ईडी विरोधात आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन स्थगित करावे अशी विनंती रोहित पवार यांनी केली. रोहित पवार आज ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे आज रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रदेश कार्यालयात राहणार आहे. तर रोहित पवार ईडी कार्यालयात जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार आणि बहीण रेवती सुळे उपस्थित होत्या.

रोहित पवार ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ईडी कडून करण्यात येत असलेल्या कारवाईला संपूर्ण सहकार्य आपल्याकडून करण्यात येत आहे. ईडी अधिकाऱ्यांविरोधात कुणीही कार्यकर्त्यांनी काही चुकीचं बोलू नका त्यांच्या विरोधात घोषणा देखील देऊ नका. ते त्यांचं काम करत आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपल्याकडून जी काही माहिती ईडी किंवा इतर तपास यंत्रणेने जर आपल्याला मागितलीच ते आपण देणार आहोत. पुढे रोहित पवार म्हणाले की, मी व्यवसायात कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही. मी आधी व्यवसायात आलो आहे आणि नंतर राजकारणात आलो आहे अशी अनेक लोक आहेत की जे पहिल्यांदा राजकारणात आले आहेत. नंतर व्यवसायात आले आहेत. पण त्यांना कोणतीही अडचणी आलेल्या नाही. मी व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्यात तेव्हा देखील मी संघर्ष केला आहे आणि आज राजकारणात आल्यानंतर संघर्ष करत आहे. येथून पुढेही मला संघर्ष करावा लागणार आहे. आज महाराष्ट्रातील लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करत आहेत असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, तुम्ही जे काही बोललात, ते ईओडब्ल्यू यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात २० तारखेला दाखल केला आहे.१९ जानेवारीला मला नोटीस आली २० जानेवारीला ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट फाईल केला आहे. याबाबतची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून मिळाली आहे. तो क्लोजर रिपोर्ट मिळावा यासाठी आम्ही न्यायालयात पत्र दिले आहे. क्लोजर रिपोर्ट कधी दिला जातो जेव्हा त्या केसमध्ये तथ्य नाही. मला ज्या केससाठी समन्स आला आहे. त्यात अनेक लोकांची नावे आहेत. त्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे हे त्यांची माहिती घेतल्यानंतर कळेलच. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. मी अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही. शेवटी समन्स आला असेल माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदार नागरिक म्हणून माझी आणि मी ते करत आहे असे रोहित पवार म्हटले. रोहित पवार म्हणाले की, बाकीच्या लोकांनी जेव्हा कारखाने घेतले. त्यावेळी राजकीय बोर्ड होते. जेव्हा मी कारखाना घेतला त्यावेळी तिथे प्रशासक होते आणि आयएसआय अधिकारी होते. यात काय तथ्य, कागदपत्रे आहे. ही सर्व कारवाई झाल्यानंतर त्यांची माहिती तुमच्याकडे देईन. आमच्यावर जी कारवाई झाली त्या कुठेही बारामती अॅग्रोजे नाव टीआयएलमध्ये नाही. ते नसताना सुद्धा आमचे नाव घेतले आहे. आम्ही ईडीला सहकारी करत आहोत. मोठ्या संस्थांनी आपल्याला समन्स पाठविले कारवाई करणार असेल आपल्यावर कारवाई करणार असतील तर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांची असते. तशी आमची देखील आहे असे रोहित पवार म्हटले.

रोहित पवार म्हणाले की, आजची चौकशी कशी जाते ते बघू या. योगायोग बघा पुढील काही महिन्यात निवडणुका होणार आहे. यानंतर या कारवाया सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे की, ईडीचे अधिकारी त्यांचे काम प्रमाणिक पणे करत आहेत. पण निवडणुकीच्या तोंडावर या कारवाई सुरू असताना लोकांच्या मानात संभ्र निर्माण झालेला आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारणीच्या कामासाठी आज दोन तासांचा ब्लॉक, या वेळेत महामार्ग असणार बंद

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन सुरू, २०४७ पर्यंत भारत विकसित देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss