पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या गोष्टीचे आहेत शरीरासाठी फायदे

आपल्या दैनंदिन जीवनात शरीराबाबत अनेक समस्या निर्माण होतात. आपल्याला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्यांवर उपाय करण्यासाठी काहीजण डॉक्टरकडे जातात तर काहीजण घरच्या घरी उपाय करतात

पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या गोष्टीचे आहेत शरीरासाठी फायदे

आपल्या दैनंदिन जीवनात शरीराबाबत अनेक समस्या निर्माण होतात. आपल्याला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्यांवर उपाय करण्यासाठी काहीजण डॉक्टरकडे जातात तर काहीजण घरच्या घरी उपाय करतात. असाच एक घरच्या घरी नैसर्गिक रित्या केला जाणारा उपाय म्हणजे पूजेसाठी वापरले जाणारे कापूर. हिंदू धर्मात कापूराला मोठे महत्व आहे. प्रत्येकाच्या घरी कापूर जाळला जातो. कापूर जाळण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. कापूर हे अनेक लहानमोठ्या पूजेसाठी त्याचबरोबर यज्ञामध्ये वापरला जातो. धार्मिक मान्यतेनुसार घरी कापूर जाळला तर घरातील वातावरण शुद्ध होऊन घरात सुखशांती लाभते. कापराच्या वासामुळे घरातील किटाणू नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते आणि त्यामुळे आपल्याला देखील प्रसन्न वाटते. म्हणूनच कापराचा वापर हा पूजेसाठी केला जातो. आपण जर घरी कापूर जाळले तर घरासोबत त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी देखील होतो. तुम्हाला माहिती आहे का की कापूर आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो. आपल्या आरोग्याबाबतच्या अनेक समस्या या कापराच्या वापरामुळे नष्ट होऊ शकतात. आपल्या शरीराबाबतच्या अनेक तक्रारी कापूर दूर करतो. कापूरमध्ये अँटिऑक्सिडंट (Antioxidant) हा घटक योग्य प्रमाणात असल्यामुळे आपल्या आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात. आयुर्वेदात कापराचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कापराचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे.

श्वसनाच्या आजारांपासून मुक्ती

बऱ्याच जणांना श्वसनाशी निगडित बऱ्याच समस्या असतात. कापूर घशाला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतो. तुमचा खोकला हा बऱ्याच वर्षांपासून असेल तर कापरामुळे तुमचा दीर्घकालीन टाकलेला खोकला बारा होऊ शकतो व तुम्हाला आराम मिळू शकतो. ततसेच श्वसनाच्या अनेक आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते.

वेदनांपासून आराम

आपल्या शरीरातून येणाऱ्या तीव्र वेदनांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. तुम्हला जर कोणत्याही ठिकाणी जखम झाली तर त्यावर लगेच पाण्यात कापूर मिसळून लावावा असे केल्याने तुम्हला आराम मिळेल आणि जखम लवकर कमी होऊन तुमच्या वेदना थांबू शकतात. त्याचबरोबर सांधेदुखी पासून त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना कापरामुळे आराम मिळू शकतो.

खाज कमी होते

काहीवेळेस आपल्या शरीराला भरपूर खाज सुटते. त्यामुळे शरीरावरची खाज कमी करण्यासाठी कापराचा वापर करावा. खाज कमी करण्यासाठी कापूर फार परिणामदायी ठरतो.

केसांच्या समस्यांवर फायदेशीर

कापूर हा केसांच्या समस्यांसाठीही फायदेशीर ठरतो. अनेकजणांना केसांच्या भरपूर तक्रारी निर्माण होतात. अश्या केसांच्या समस्यांवर कापूर पूर्णपणे प्रभावी पडू शकतो. त्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात कापूर मिसळून तो रोज केसांना लावा त्यामुळे तुमच्या केसातील कोंडा काही दिवसातच नाहीसा होईल.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version