Tuesday, April 16, 2024

Latest Posts

पुलाव खायला आवडते,तर जाणुन घ्या वेगवेगळ्या प्रकारची पुलाव रेसिपी

हिवाळ्यात भुकेचे प्रमाण वाढते,थंडीमध्ये आपल्याला नवनवीन पदार्थ बनवून खाण्याची इच्छा होत असते.काहीतरी उबदार आणि शरीरासाठी पौष्ठिक असं काहीतरी आपण घरी बनवुन खात असतो.

हिवाळ्यात भुकेचे प्रमाण वाढते,थंडीमध्ये आपल्याला नवनवीन पदार्थ बनवून खाण्याची इच्छा होत असते.काहीतरी उबदार आणि शरीरासाठी पौष्ठिक असं काहीतरी आपण घरी बनवुन खात असतो.जेणे करुन आपण जे खाऊ ते आपल्याला पचायला देखील हलके जाईल असे काहीतरी घरी बनवयाचं प्रयत्न असतो.. हिवाळा सुरू झाला की, मुगाच्या डाळीपासून गाजराच्या हलव्यापर्यंत आणि पुलावापर्यंत अनेक स्वादिष्ट पदार्थ घरोघरी बनवले जातात.हिवाळा सुरू होताच कोबी, वाटाणे, गाजर, ताजा मुळा, सलगम अशा अनेक वस्तू बाजारात पाहायला मिळतात. या पदार्थांनी महिला स्वयंपाकघरात लोणच्यापासून पुलाव, बिर्याणीपर्यंत अनेक गोष्टी बनवतात.पुलाव भात हा सहज आपण आपल्या घरी बनवत असतो.पण वेगवेगळ्या पुलावाची चव चाखायची असले तर जाणुन घ्या पुलावीची रेसिपी

व्हेज पुलाव

व्हेज पुलाव हा सणासुद्धीच्या किंवा इतर वेळी सहज घरी बनवला जातो.बिर्याणीपेक्षा थोडा वेगळा पण बिर्याणीसारखाच हा पुलाव बहुतेक घरांमध्ये बनवला जातो आणि खाल्ला जातो. स्वादिष्ट पारंपारिक मसाले आणि हंगामी भाज्यांच्या चवीने व्हेज पुलावची चव अप्रतिम लागते. या व्हेज पुलावात अनेक प्रकारच्या भाज्या मटर,गाजर वापरले जाते. तसंच हा पुलाव पापडासोबत खायला  प्रत्येकाला आवडतं.

लखनवी पुलाव

हा पुलाव प्रथमच लखनऊमध्ये बनवला गेला, लखनऊमध्ये इतर अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध असले तरी पुलावची ही खास डिश नवाबांच्या शहरात खूप लोकप्रिय आहे. स्वादिष्ट पारंपारिक मसाल्यांनी भरलेला आणि लखनवी पुलाव प्रत्येकाने एकदा चाखायला हवा.

लेमन पुलाव

हा पुलाव दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. या लेमन पुलावमध्ये कढीपत्ता, मसूर, शेंगदाणे आणि ताज्या लिंबाचा रस वापरतात. हा भात कोणीही अगदी सहज बनवू शकतो, जो अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

काश्मिरी पुलाव

काश्मिरी पुलावची ही अप्रतिम रेसिपी खायला सर्वांनाच आवडेल. स्वादिष्ट मसाले आणि बासमती तांदळाच्या सुगंधाने भरलेला हा पुलाव केशर आणि ड्रायफ्रूट्सने तयार केला जातो. हा पुलाव खास प्रसंगी सर्व्ह करण्यासाठी उत्तम आहे.

तवा पुलाव

हे मुंबईचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे, जे मुंबईच्या रस्त्यावर सहज उपलब्ध आहे. हा पुलाव स्वादिष्ट मसाले, भाज्या आणि पावभाजी मसाला घालून तव्यावर तयार केला जातो.हा पुलाव प्रत्येक मुंबईकरांच्या आवडीचा पुलाव आहे.

हे ही वाचा:

तेजस्विनी पंडितनं पुण्यात सुरु केलं मिडनाईट सलून,राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

चंद्रभागा नदीला आले गटाराचे रूप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये संताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss