spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

चंद्रभागा नदीला आले गटाराचे रूप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये संताप

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या चंद्रभागा नदीला गटाराचे स्वरूप आले आहे.

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या चंद्रभागा नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. या नदीच्या दयनीय अवस्थेकडे शासन आणि प्रशासना दुर्लक्ष करत असल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. या नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व चंद्रभागा नदीला महत्व आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे लाखो भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये पंढरपूर येथे येऊन ‘नमामि चंद्रभागा’ (Namami Chandrabhaga) या प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र घोषणा करण्यात आलेला हा प्रकल्प अजून कागदावरच आहे.

चंद्रभागा नदीच्या साफसफाईसाठी मंदिर प्रशासन आणि नगरपालिकेकडून निधी देण्यात येतो. मात्र हा निधी देऊन सुद्धा वाऱ्याकऱ्यांच्या नशिबी घाण आहे. वारकऱ्यांना चंद्रभागा नदीतील घाणीमध्येच स्नान करावे लागते, घाणीने भरलेल्या नदीमध्ये भजन करावे लागत आहे. दिवसेंदिवस चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था होत आहे. याकडे प्रशासनाचे देखील बोलले जात आहे. मृत्यू झाल्यानंतर होणारे दशक्रिया विधी चंद्रभागेच्या पवित्र ठिकाणी केले जातात. यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने नागरिक येत असतात. दशक्रिया विधी नंतर केस, ब्लेडची पाने, कपडे तसेच पिंडदान केलेले भाताचे गोळे असेच उघड्यावर टाकले जातात. तसेच नदीच्या पात्रामध्ये मृतांच्या अस्थी, कपडे , वस्तू चंद्रभागेत सोडून दिल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने सगळीकडे भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

देशभरातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात. ही प्रथा मागील अनेक वर्षेपासून चालू आहे. पण चंद्रभागा नदीच्या पात्रात घाण जमा झाल्यामुळे वारकरी संतप्त आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प कागदावरच राहिला. चंद्रभागेत येणाऱ्या भाविकांना कधी स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल, असा प्रश्न वारकरी समुदायाकडून उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा:

Union Budget 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, नवीन संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिले भाषण, म्हणाल्या…

पुण्यात १५ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करत केला अत्याचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss