spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

New Year मध्ये फिरायला जायचा विचार करताय? तर पुण्यातील या ठिकाणांना द्या नक्की भेट

सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत. तसेच काही पर्यटक अजून विचार करत असतील.

Tourist Points Near Pune : सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत. तसेच काही पर्यटक अजून विचार करत असतील. तसेच काहींना आपल्या राज्यात देखील फिरायला खूप जास्त आवडत असते. आणि या साठी आम्ही पुण्यातील काही खास ठिकाण तुम्हाला सांगणार आहोत . विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात. केवळ विद्यार्थीच नाही तर या ठिकाणी दरवर्षी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. पुणे आणि आसपासच्या परिसरात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जेथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. तसेच लाँग वीकेंडमध्ये निसर्ग, थंडी आणि खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर अनेकजण पुण्याची निवड करतात. पुण्याच्या आजूबाजूच्या पर्वतरागा अनेक ट्रेकर्सला आकर्षित करते तर खाद्यसंस्कृती खवय्यांना आकर्षित करते.

कामशेत (Kamshet) – जर तुम्हाला सुंदर ठिकाणी फिरायचं असेल तर तुम्ही कामशेतला नक्कीच जाऊ शकता. कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून ओळखले जाते. अनेक पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी कामशेतला येत असतात. पुण्यापासून हे ठिकाण जवळपास ४८ किमी अंतरावर आहे. हे लोणावळ्यापासून अगदी जवळ आहे.

लोहगड (Lohagad Fort for one day picnic) – ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला लोहगड पुण्यापासून ६५ किमी अंतरावर आहे. रस्ते मार्गाने तुम्ही लोहगड येथे पोहोचू शकता. या गडाची समुद्रसपाटीपासून उंची ३४००० फऊट इतकी आहे. या किल्ल्याला एकूण ४ मुख्य प्रवेशद्वार आहेत. ज्यामध्ये नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमा दरवाजा आणि महा दरवाजा यांचा समावेश आहे.

लोणावळा (lonavala) – लोणावळा हे ठिकाण मुंबई आणि पुणे पासून अगदी जवळ आहे. बहुतेकांचं हे ठिकाण खूप जास्त आवडीचे ठिकाण आहे. लोणावळ्याजवळ अनेक स्पॉट्स आहेत जिथं तुम्ही निसर्गाचा आनंद अगदी मनसोक्त घेऊ शकता. टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट शिवाय चांगले रिसॉर्ट्सदेखील आहे.

खंडाळा (khandala) – लोणावळा जवळच खंडाळा हे एक सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक मानलं जातं. पुण्यापासून ६९ किमी अंतरावर आहे. पर्यटन खंडाळ्यातील धुकं पाहून निसर्गाचा आनंद लुटताना दिसत असतात.

महाबळेश्वर (Mahabaleshwar) – निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर वीकेंड ट्रिपसाठी खूपच खास आहे. येथील नद्या, धबधबे आणि धुक्यात लपलेले शिखरे हे एक सुंदर ठिकाण आहे.

वाई (wai) – वाई हे पुण्यातील कृष्णा नदीजवळ वसलेले अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. याला विराट नगरी असेही म्हणतात. पुण्यापासून ८५ किमी अंतरावर आहे. शिवाय पुणे ते वाई प्रवास करत असताना तुमची चांगली रोड ट्रिपदेखील होईल. कारण वाई ते पुण्याचा रस्ता घाटातून जातो या घाटाचादेखील तुम्ही आनंद घेऊ शकता.

हे ही वाचा:

शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss