Saturday, July 27, 2024

Latest Posts

केसांच्या आरोग्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतींनी करा वापर

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. केस गळती, वजन वाढणे, त्वचेवर पिंपल्स येणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. जर मोठ्या प्रमाणावर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही कॉफीचा वापर करून यावर आराम मिळवू शकता. कॉफी त्वचा (Coffee For Skin) आणि केसांसाठी गुणकारी मानली जाते. केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करु शकता. कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करतात. कॉफीमध्ये असलेले कॅफेन केस गळणे कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करते. केसांना नियमितपणे कॉफी लावल्याने केस लांब, दाट आणि मजबूत होतात. केस वाढवण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात.

कॉफी आणि खोबऱ्याचं तेल (Coffee And Coconut Oil)

जर तुमचे केस नेहमी गळत असतील तर तुम्ही कॉफीमध्ये खोबऱ्याचे तेल मिक्स करून लावू शकता. एका भांड्यामध्ये गरजेनुसार खोबरेल तेल काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कॉफी मिक्स करा. हे मिश्रण टाळूवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. हे सुमारे ३० मिनिटं होईपर्यंत तसेच ठेवून द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

कॉफी पावडर वापरून केस धुवने (Wash Your Hair With Coffee)

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कॉफीने केस धुणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी एका भांड्यात ब्लॅक कॉफी तयार करा.त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस धुवा आणि केसांमधील पाणी पिळून घ्या. त्यानंतर डोक्यावर हे मिश्रण ओता आणि हलक्या हातांनी मसाज करून घ्या. साधारण २० मिनिटे केस पाण्याने धुवून घ्या. तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा अशा प्रकारे केसांना कॉफी वापरू शकता. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.

कॉफी आणि कोरफड गर (Coffee And Aloe Vera)

कॉफी पावडरमध्ये कोरफडीचा गर मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता. यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे कॉफी पावडर आणि २ चमचे कोरफडीचा गर घेऊन ते मिक्स करून घ्या. मिश्रण तयार करून टाळूवर लावा आणि डोक्याला मसाज करा. हे मिश्रण ३० मिनिटं डोक्याला लावून ठेवा. हे आठवड्यातून दोनदा लावल्याने केस देखील लांब, दाट आणि चमकदार होतात.

हे ही वाचा:

सध्याचे सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले विविध महत्त्वाचे निर्णय, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss