Friday, April 19, 2024

Latest Posts

सध्याचे सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे

सध्याचे सरकार असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे.

सध्याचे सरकार असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी आक्रमक कधी होतात, जेव्हा अन्याय होतो. सरकारने अमानुषपणे अन्याय केला आहे. सरकार कष्ट करणाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक अडचणी साखर कारखान्यांबाबत निर्माण झाल्या आहेत. परंतु हे प्रश्न खोके सरकार सोडवू शकत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे सरकार असंवेदनशिल सरकार आहे. खोक्याचे सरकार आहे. शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, त्यावर चर्चा होत नाही. आज आमच्या मिटींगमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. आमच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. हे असंवेनशील सरकार आहे. घरफोड, ईडी, सीबीआय लावायचे येवढेच उद्योग हे सरकार करत आहेत. आक्षणावरुन जरांगे पाटील यांच्यावर अन्याय होत आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजावर अन्याय झाला आहे. हे सरकार कोणाला न्याय देऊ शकले नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात गेलो आहे. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. आम्ही त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. एका अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष काढून घेतला आहे. पवार साहेबांनी कुठलाही पक्ष घेतला नाही, तर स्वतः पक्ष काढला आहे. यामुळे आयोगाचा निर्णय आम्हाला अयोग्य आणि चुकीचा वाटला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांनी काँग्रेस सोडली किंवा त्यांना नोटीस मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले नाही. पक्षाची जी बैठक झाली त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या सांगण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारासाठी कुठले नेते येणार याचे नियोजन सुरू असून पवार इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत बोलत आहेत असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत. त्याविषयी तसेच जागावाटपाची माहिती बैठकीत देण्यात आली. वेळ नियोजन, सभा याबाबत चर्चा झाली. उद्या पवार उद्धव ठाकरेंसोबत बोलणार आहेत. महाराष्ट्रात प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेते किती वेळ देणार, शरद पवार, राहुल गांधी किती वेळ देणार याची चर्चा झाली असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंगलदास बांदल यांच्यावर पक्षाची कोणती जबाबदारी आहे? मला जयंत पाटील यांना विचारावे लागणार आहे. परंतु कोणत्या राष्ट्रवादी संदर्भात हा विषय आहे. कारण सध्या दोन राष्ट्रवादी आहेत ना? मला याबाबत काही माहीत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss