Saturday, July 27, 2024

Latest Posts

Valentine Week : रोज डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत जाणून घ्या संपूर्ण यादी

नुकताच फेब्रुवारी महिना हा चालू झाला आहे. फेब्रुवारी महिना जवळ आला की सर्व प्रेमी वर्गाला चाहूल लागते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची.

नुकताच फेब्रुवारी महिना हा चालू झाला आहे. फेब्रुवारी महिना जवळ आला की सर्व प्रेमी वर्गाला चाहूल लागते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची. जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन दिवसाची त्याचबरोबर त्या पूर्ण वीक ची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन दिवस हा जवळ येत आहे. प्रत्येकाला या दिवशी त्याच्या जोडीदाराला त्याच्या प्रेमाची औपरिक पानांची कबुली देण्याची संधी मिळत असते. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. त्या आधीचा पूर्ण एक आठवडा असतो जो रोज कोणत्या ना कोणत्या डे ने साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) हा ७ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. आणि तोच १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. हा कालावधी प्रेम सप्ताह म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन वीक २०२४ चे वेळापत्रक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीक चा शेवटचा दिवस असतो. त्या आधी अनेक डे चा समावेश असतो. त्यामध्ये रोज डे, टेडी डे, हग डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, किस डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन डे यांचा समावेश आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील दिवसांची संपूर्ण यादी खाली दिली आहे.

व्हॅलेंटाईन डे वीक ( Valentine Week List 2024)

१) रोज डे, ७ फेब्रवारी २०२४ (बुधवार) – व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. रंगीबेरंगी गुलाबाची फुलं वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात.

२) प्रपोज डे, ८ फेब्रुवारी २०२४ (गुरुवार) – रोज डे नंतरचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला मनातील सर्व गोष्टी व्यक्त करू शकता.

३) चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी २०२ (शुक्रवार) – व्हॅलेंटाईन डेच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या क्रशला, किंवा जोडीदाराला चॉकलेट देऊ शकता.

४) टेडी डे, १० फेब्रुवारी २०२४ (शनिवार) – टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे.

५) प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी २०२४, (रविवार) – व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी एकमेकांना वाचन दिले जाते.

६) हग डे, १२ फेब्रुवारी २०२४ (सोमवार) – व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी कपल्स एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून काहीही न बोलता ते एकमेकांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त करू शकता.

७) किस डे, १३ फेब्रुवारी २०२४ (मंगळवार) – व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाणार आहे.

८) व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी २०२४ (बुधवार) – व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल सहलीचा, तर कुठे डिनरचा प्लॅन करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी ते प्लॅन करतात.

हे ही वाचा:

Raj Thackeray Live: काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार, नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss