महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा सुरु असून आज २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेच्या संदर्भात चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सुद्धा चाचपणी करत आहेत. मी सुद्धा काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार आहे, यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. प्रत्येक वेळची निवडणूक वेगवेगळी असते. मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
गोडसे गेले, गांधी गेले. आता एकमेकांचे वाभाडे काढायचे थांबवा. आताचं बघा. मूर्खाचा बाजार आहे सर्व. सध्याच्या प्रश्नावर कोणी काही बोलत नाही. महागाई आहे, इतर प्रश्न आहेत, त्यावर बोलाना, भूतकाळ सोडून द्या. जे गेलेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं. आता जे सुरु आहे, ज्या समस्या आहेत, त्या सोडवा, त्यावर लक्ष केंद्रित करा, असे माध्यमांशी बोलतांना राज ठाकरे म्हणाले. कसली चौकशी करणार , कुणाला बोलावणार, मूर्खाचा बाजार सगळा. राजकीय अवस्था खालावली तशी पत्रकारितेची अवस्था. मूळ विषयांना हातच लावायचे नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत आले तर घेणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता, त्यवर संजय राऊत म्हणाले होते की, निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा देण्यात आलं नव्हतं, तरीही ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले की, यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.
टोलला माझा विरोध नाही. माझी मागणी आधीपासून इतकीच आहे टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी जी आपल्याकडे नाही. जगभरात टोल असतोच पण आपल्याकडे नक्की किती टोल भरलाय ह्याचा हिशोब लोकांना दिला जात नाही ह्याचा मला राग आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या समोर मध्यंतरी टोलनाक्यांवर जी आकडेवारी गोळा केली आहे ती सादर करणार आहे. लोकांच्या पैशानी जर टोलचा कंत्राटदार गब्बर होणार असेल किंवा राजकीय पक्षांच्या निधीत भर पडणार असेल तर माझा विरोध आहे. पत्रकारांना टोलच्या आंदोलनानंतर फुटलेल्या काचा तुम्हाला दिसतात पण तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी विचारला.
हे ही वाचा:
UNION BUDGET 2024: महाराष्ट्रासाठी काय मिळालं हा प्रश्न कायम – Rohit Pawar
छगन भुजबळ यांचा हल्लबोल, ज्या शिवसेनेत तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर