Sunday, May 19, 2024

Latest Posts

जागतिक एड्स दिन २०२३: जागतिक एड्स दिनाचा इतिहास आणि यंदाची थीम

जागतिक एड्स दिन २०२३:- जगभरात जागतिक एड्स दिन (World AIDS Day) १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

जागतिक एड्स दिन २०२३:- जगभरात जागतिक एड्स दिन (World AIDS Day) १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एड्स (एचआयव्ही) (HIV) हा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या (Human Immune deficiency virus) संसर्गामुळे पसणारा हा आजार आहे. या आजराबदल लोकांमध्ये अनेक समज गैसमज आहेत. जागतिक एड्स दिन समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जगात ३७. ९ टक्के लोक एड्स या आजाराने ग्रस्त आहेत. तर सोसायटी ऑफ इंडियानुसार (Society of India), भारतात एड्सच्या एकूण रुग्णाची संख्या ही २. ३५ मिलियन आहे. एड्सच्या रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ होत आहे.

जागतिक एड्स दिनाचा इतिहास

१९८३ ऑगस्ट मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (World Health Organization), जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांच्या सहमतीनंतर १ डिसेंबर १९८८ पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. ‘जागतिक एड्स दिन’ प्रथम जेम्स डब्लू बून आणि थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. एड्स आजार होण्यापूर्वी अनेक आठवड्यांपासून ताप येणे, कित्येक आठवडे खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, भूक न लागणे, अन्नावरची इच्छा नाहीशी होणे, सतत जुलाब होणे, झोपताना घाम येणे इत्यादी काही लक्षणे जाणवू लागतात.

 

जागतिक एड्स दिनाची २०२३ ची थीम लेट कम्युनिटीज लीड’अशी आहे. या ‘लेट कम्युनिटीज लीड’ थीमचे उद्दिष्ट एड्सने बाधित समुदायांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करणे असे आहे. ही थीम एड्सने बाधित असलेल्या लोकांना आवाज उठवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी कृती करण्यास सक्षम असल्याची गरज आहे. एड्स असलेल्या लोकांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि समान रोजगाराच्या संधी मिळाव्यात.

हे ही वाचा:

ENTERTAINMENT: कोलंबिया युनिव्हर्सिटीत होणार ‘चैत्यभूमी’ माहितीपटाचे प्रदर्शन

हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss