Sunday, May 19, 2024

Latest Posts

” माझ्या उमेदवारीने आघाडीच्या तंबूत घबराट…; उज्वल निकमांचा वडेट्टीवारांना टोला

दुर्देवी भाष्य कॉंग्रेसकडून झालं. हे अतिशय दुर्देवी आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath shinde)विरोधकांचा विरोध केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी ही "विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे.”देखील टीका केली होती. 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार उज्वल निकम(Ujwal Nikam) यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर आरोपाचे धडे सुरु झाले आहेत. पुनम महाजन(Poonam mahajan) यांचे तिकीट नाकारुन उज्वल निकमांनी तिकीट दिले. मुंबई उत्तर मध्ये लोकसभा मतदारसंघात उज्वल निकम यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस च्या वर्षा गायकवाड(Varsha gaikwad) हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे चांगलीच लढाई मतदारसंघात होणार आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) यांनी ” उज्वल निकम हा बेईमान माणुस आहे. वकिल नसुन देशद्रोही आहे” असा त्यांच्यावर आरोप केले. तर शहिद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबच्या बंदुकीतील गोळी नव्हती तर ती आर.एस.एस समर्पित पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीची गोळी होती असे ही ते म्हणाले. त्यावर आज उज्वल निकम यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या ट्विटच्या अधिकृत अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात ते असं म्हणाले आहेत की, “उज्वल निकम देशद्रोही. त्यांनी २६-११ च्या घटल्यामध्ये महत्त्वाचा पुरावा लपवला. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांचा खून ज्यांनी केला त्या आर.एस.एस.च्या कार्यकर्त्यांला लपवलं. हे कुठुन नवीन शोधुन आणलं आणि हे आजच तुम्हाला बोलायची औदसा का आठवली? कारण उज्वल निकम तुमच्या विरोधात उभे राहिले आहेत याची भिती तुम्हाला वाटायला लागली.हा उज्वल निकम आपली बिंग यापुढे फोडेल आणि मी नक्की फोडणार आहे. घाबरु नका.”

तर “माझ्या उमेदवारीने आघाडीच्या तंबूत घबराट… त्यातूनच माझ्यावर वाट्टेल ते आरोप केले जात आहेत.”असे या व्हिडिओला कॅप्शन देत उज्वल निकम यांनी विरोधकांना शाब्दिक चोप दिला आहे. दरम्यान, यावर “दुर्देवी भाष्य कॉंग्रेसकडून झालं. हे अतिशय दुर्देवी आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath shinde)विरोधकांचा विरोध केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी ही “विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे.”देखील टीका केली होती.

हे ही वाचा:

BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray हे Sharad Pawar यांच्या नादी लागुन रावणराज्य आणायला चाललेत, Sadabhau Khot यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss