Saturday, May 18, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray हे Sharad Pawar यांच्या नादी लागुन रावणराज्य आणायला चाललेत, Sadabhau Khot यांची टीका

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नादी लागुन रावण राज्य आणायला चालले आहेत,’ अश्या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,” या देशात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत इंडिया आघाडीच्या लुटारुंची टोळी आणि दुसऱ्या बाजुला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशातील जनता एकवटलेली आहे. आणि निश्चित पणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती बघली तर २०२४ च्या पुर्वी संपुर्ण राज्याचा विकास ठप्प झाला होता, परंतु नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यासाठी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे.”

पुढे ते म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला आहे. हातकंणगले मधून धैर्यशील माने मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. हातकंणगले मधील जनता महायुतीच्या पाठिशी आहे. या देशात उद्धव ठाकरेंनी भाषण करताना म्हणाले कि आम्हाला राम राज्य आणायचे आहे, परंतु उद्धव ठाकरे देवाच्या आळंदीला जायचं सोडून चोरांच्या आळंदीला चाललेत. शरद पवारांच्या नादी लागुन रावण राज्य आणायला चालले आहेत. हातकंणगले मधील जनता हनुमानाची जनता बनुन हे उध्वस्त केल्या शिवाय राहणार नाही.”

हे ही वाचा:

BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

Mahayuti च्या जाहिरातींवरून Congress नेते Atul Londhe यांची निवडणूक आयोगात तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss