५ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या सांगता सभा झाल्या. काल बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार(Sharad Pawar) अशा प्रचारसभा पार पडल्या. महाविकास आघाडीचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे(Supriya sule) यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले होते.रविवारी दिवसभर सभा होत्या. त्यावेळी बारामतीतील सभेदरम्यान शरद पवारांचा घसा बसल्याने त्यांनी आपले भाषण अवघ्या सात मिनिटांमध्ये आटोपले. शरद पवारांची तब्येत खालावल्याने अनेक कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे(Hemant Dhome) यांनी पवारांचा फोटो पोस्ट करत पवारांबद्दल भावना व्यक्त केली आहे.
“आदरणीय साहेब… आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…” असे लिहत शरद पवारांना आपली काळजी घ्या असं भावनिक आवाहन केले. रविवारी झाल्याले सभेत शरद पवारांची तब्येत अस्वस्थ वाटत होती. त्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या आहेत. सततच्या धावपळीमुळे शरद पवारांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानंतर पवारांनी विश्रांतीचा निर्णय घेतला असून बारामतीतील गोविंद बागेत डॉक्टर तपासणीसाठी आले आहेत.
याआधी देखील हेमंत ढोमे हे राजकारणासंदर्भातील आपलं मत परखडपणे मांडत असतात. तर “मतदान नक्की करा पण मतदान करण्याआधी ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याचा पक्ष आणि चिन्ह जरूर तपासा… पक्षाला मत द्यायचं असेल तर उमेदवार तोच आहे का ते तपासा… चिन्ह बदललं नाही ना ते पण तपासा… ते सगळं सोडा, त्याचं नाव तेच आहे का? तो माणुस तोच आहे का? याची पण खात्री करून घ्या!”असे ही ट्विट त्यांनी याआधी केले होते. हेमंत ढोमे हे दिगदर्शक, अभिनेता आणि उत्तम लेखक आहेत. झिम्मा(Zhimma), झिम्मा-२(Zhimma-2), चोरीचा मामला (Choricha mamla), बघतोस काय मुजरा कर(Baghtoys kay mujra kar), ऑनलाईनबिनलाईन (Online Binline) असे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत.
दरम्यान, “शरद पवारांची तब्येत चांगली आहे.”असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी माध्यमांना सांगितले तर “शरद पवार हे पुन्हा मैदानात सज्ज होतील.त्यानंतरच्या सगळ्या सभा आम्ही दुप्पटीने करु”असे शिरुर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ही सांगितले.
हे ही वाचा:
“पाकिस्तानची भाषा करणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे”; फडणवीसांची विडेट्टीवारांवर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.