Chhagan Bhujal यांचा मोठा निर्णय, Nashik Loksabha Constituency मधून घेतली माघार,

Chhagan Bhujal यांचा मोठा निर्णय, Nashik Loksabha Constituency मधून घेतली माघार,

chhagan bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार, १९ एप्रिल) पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. महायुतीमधील विवादित नाशिक लोकसभा मतदारसंघातील जाजेवरून निवडणूक न लढवण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतला आहे. छगन भुजबळ यांच्या निर्णयाने महायुतीतील नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा सुटला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. तरीही, महायुतीमध्ये काही जागांवर तिढा कायम आहे. अश्यात, नाशिकमधील जागेचा तिढा आता सुटला असून राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले, “अमित शाह यांनी नाशिकच्या जागेवरून आमच्याशी चर्चा केली. त्यावेळी, छगन भुजबळ यांना उभे करा, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितले कि तिथे हेमंत गोडसे आमचे उमेदवार आहेत. त्यावेळी शाह यांनी ‘आम्ही त्यांना समजावू” असे सांगितले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा फोन करून ‘अमित शहा यांनी तुम्हाला लढावेच लागेल’ असे सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा तेच सांगितले. मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी उमेदवार जाहीर झालेला नाही.”

“महाविकास आघाडीचे उमेदवार मागील तीन आठवड्यांपासून मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळे जेवढा वेळ निर्णय घ्यायला लागेल तेवढ्याच महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. म्हणून सध्या जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी निवडणुकीतून माघार घेत आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवणार आहे. मी राज्यभरात महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मला आतापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.” असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

LOKSABHA ELECTION च्या पहिल्या दिवशी अजित पवारांची दर्ग्यात धाव

राजनीती गेली खड्ड्यात.. Amravati प्रचारसभेत Navneet Rana झाल्या आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version