Thursday, May 2, 2024

Latest Posts

LOKSABHA ELECTION च्या पहिल्या दिवशी अजित पवारांची दर्ग्यात धाव

अजित पवार यांनी नुकतेच पुण्याच्या दगडूशेठ ला साकडे वाहिले होते आता ते धाराशिवच्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्यात दिसून आले आहेत. 

सध्या निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. आजपासून मतदान सुरु देखील झाला आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून आजपासून ते सुरु देखील झाले. अशा वेळेस उमेदवार जीवाचं रान करून आपला प्रचार करत आहेत. तर बरेच उमेदवार देवांला साकडे देखील घालत आहे. अजित पवार यांनी नुकतेच पुण्याच्या दगडूशेठला साकडे वाहिले होते. आता ते धाराशिवच्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्यात दिसून आले आहेत.

धाराशिवमधील सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचा मोठा उरूस देखील भरतो. आज अजित पवार धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी हजरत शमशोद्दीन गाझी यांच्या दर्ग्यास भेट दिली. त्यांनी मजारावर चादर चढवली आणि प्रार्थनादेखील केली. डोक्यावर टोपी आणि फुलांची चादर घेऊन पवार दर्ग्यात गेले होते. यामध्ये त्यांच्यासोबत राणा जगजितसिंह पाटील, अर्चना पाटील, आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दर्ग्याच्या समितीच्या वतीने अजित पवारांचा सत्कार देखील करण्यात आला. अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे हे देखील धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. धाराशिवमधील अहिल्यादेवी चौकात अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांकडून चांगलेच स्वागत झाले. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांच्या उरुसास हिंदू मुस्लिम सर्वच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले देवस्थान आहे.

सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांच्या समवेत त्यांनी पुण्यातील दगडूशेठचे दर्शन घेतले होते. दोघांनी दगडूशेठची आरती देखील केली आणि मोठा विजय होऊ दे असा साकडं बाप्पाकडे घातलं. निवडणूक चांगल्या वातावरणात पार पडण्यासाठी दगडूशेठचे दर्शन घेतले असे अजित पवारांनी सांगितले. तसेच गणरायाने मला भरपूर दिले आहे, सर्वांचं भलं कर असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण

राजनीती गेली खड्ड्यात.. Amravati प्रचारसभेत Navneet Rana झाल्या आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss