Thursday, May 2, 2024

Latest Posts

राजनीती गेली खड्ड्यात.. Amravati प्रचारसभेत Navneet Rana झाल्या आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीचे आणखी सहा टप्पे पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात उमेदवारांच्या प्रचारसभांनी वातावरण दणाणून सोडले आहे. अश्यातच, अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या (Amravati Loksabha Constituency) भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांची आज (शुक्रवार, १९ एप्रिल) प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणावर भाष्य करत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांडाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आता दुसरं उमेश कोल्हे प्रकरण अमरावतीत होणार नाही.” असं वचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले,

यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थितांसमोर अतिशय आक्रमकपणे भाषण करत म्हणाल्या, “जो राम को लाये है, हम उनको लायेंगे… हे तेच काँग्रेसी आहेत ज्यांनी राम मंदिराच्या विरोधात २७ वकिलांची फौज उभी केली होती. हे तेच काँग्रेसी आहेत ज्यांनी राम मंदिराचा विरोध केला. गेल्या दहा वर्षांत देवाने अश्या व्यक्तीला पाठवलंय ज्याने ५०० वर्षांचा इतिहास मोडला आहे आणि १० वर्षात श्रीरामाला त्याच्या जागी विराजमान केले ते दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.”

उमेश कोल्हे हत्याकांडाप्रकरणी भाष्य करताना त्या म्हणाल्या, “राजनीतीसाठी मी माझा धर्म सोडणार नाही. राजनीती गेली खड्ड्यात… माझा धर्म आणि माझा भगवा कोणासमोर झुकू देणार नाही. हे राजकीय लोकांनी लक्षात ठेवावे. जोपर्यंत मी या अमरावती क्षेत्रात आहे, तोपर्यंत मी आणखी उमेश कोल्हे हत्याकांड होऊ देणार नाही, हे माझे वचन आहे.”

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदल्या दिवशी नवनीत राणा यांच्यावर टीका करत त्याचा उल्लेख नटी, नाची असा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, “कोण संजय राऊत? माझ्यावर बोलण्याआधी माझ्या वडिलांवर बोलण्याआधी आमचा इतिहास जाणून घ्या. माझ्या वडिलांनी देशाची सेवा केली, मी अमरावतीची करत आहे. माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या मुलाकडे आईकडे लक्ष द्या.”

हे ही वाचा:

Mahayuti मध्ये धुसफूस कायम, Mihir Kotecha यांच्या प्रचारसभेतून शिवसैनिकांनाच सभात्याग

Eknath Shinde यांच्या Shivsena कडून आचारसंहिता भंग, Congress ची EC कडे तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss