Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Chhatrapati Sambhajinagar मधून लढणार Sandipan Bhumare, CM Eknath Shinde यांची अधिकृत घोषणा

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) पहिला टप्पा पार पडला तरीही महायुतीमध्ये (Mahayuti) काही जागांवरून तिढा सुटत नाही आहे. अश्यातच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील महायुतीचा जागावाटपावरून तिढा आता सुटला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shivsena) हि जागा मिळाली आहे. त्यानुसार, शिवसेनेकडून संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, महायुतीकडून संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (MVA) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध एमआयएमचे (AIMIM) इम्तियाज जलील (Imtiaj Jaleel) अशी तिहेरी लढत रंगणार आहे.

महायुतीतर्फे शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेच्या अधिकृत पत्रकातून याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) अफसर खान (Afsar Khan) हे निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात असून छत्रपती संभाजीनगरमधे चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

संदीपान भुमरे यांच्या नावावर महायुतीने शिक्कामोर्तब केल्यामुळे तसेच महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे हे उभे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांनी १८ फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक बोलावली होती. शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत संदीपान भुमरे यांचे नाव नक्की करण्यात आले. त्यानंतर, संदीपान भुमरे यांनी तयारीदेखील सुरु केली होती. आता, २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

सत्ताधाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर सत्तेचा गैरवापर करतील, Sharad Pawar यांचा BJP वर निशाणा

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या Narendra Modi ना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss